विशेष प्रतिनिधी
पुणे : Mahayuti पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या खडकवासला आणि वडगाव शेरी या मतदारसंघात महायुतीकडून मैत्रीपूर्ण लढतीचा पुणे पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. खडकवासला मतदारसंघातून अजित पवार गटाचे दत्ता धनकवडे हे भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात लढणार आहेत. वडगाव शेरीतून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक लढत देणार आहेत.
खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने खडकवासला विधानसभा मतदारसंघात असल्यास उमेदवार देण्याची तयारी केल्याने भाजप देखील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची शक्यता आहे. Mahayuti
खडकवासला विधानसभा मतदारसंघात पक्षांतर्गत विरोध डावलून भाजपने पुन्हा एकदा भीमराव तापकीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. आता माजी महापौर आणि अजित पवार गटात असलेले दत्ता धनकवडे यांनी आपण खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे. Mahayuti
आपण राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आल्याचं बोललं जात आहे. आता हे उमेदवारी अर्ज फक्त दबाव निर्माण करण्यासाठी दाखल करण्यात आले आहेत की खरच मैत्रीपूर्ण लढत होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Mahayuti khadakwasla Datta Dhankawade and Wadgaon sheri Sunil Tingre
महत्वाच्या बातम्या
- Shiv Sena UBT : शिवसेना ‘UBT’ने जाहीर केली आणखी एक उमेदवार यादी !Ajit Pawar : अजित पवारांना माेठा धक्का, दाेन विद्यमान आमदारांनी घेतली शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी
- Ajit Pawar : घरी बोलावता , जेऊ घालता आणि अदृश्य हात तुतारीसाठी वापरता? अजित पवारांचे हर्षवर्धन पाटील यांच्यावर जाहीर टीका
- Congress काॅंग्रेसची २३ जणांची यादी जाहीर, लहू कानडे यांना नाकारली उमेदवारी