Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

जालना : Manoj Jarange मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 15 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली होती. पण राज्य सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ देऊन ही समिती गॅझेटचा अभ्यास करणार असल्याचा अध्यादेश काढल्याने जरांगे पाटील यांनी 15 फेब्रुवारीपासून सुरू केले जाणारे राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित केल आहे. या 15 दिवसांत म्हणजे फेब्रुवारी अखेर पर्यंत सरकारने उर्वरीत 2 मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.Manoj Jarange

मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी राज्यव्यापी आंदोलनाच इशारा दिला होता, काळ उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी त्यांची चर्चा झाली. जरांगे यांच्या काही मागण्या सरकार मान्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आंतरवली येथे गावकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे जरांगे यांनी सांगितले होते, त्याप्रमाणे त्यांनी घोषणा केली आहे.



जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई न करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सरकार सोडून देणार असल्याचा खळबळजनक दावाहि जरांगे पाटील यांनी केला आहे. देशमुख हत्या प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यात सरकारचा सहभाग आहे का.? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

महादेव मुंडे यांच्या पत्नीने आंदोलन करण्याचा ईशारा दिलाय. यावर बोलताना धनंजय मुंडेंची भावजय असताना अशी वेळ येऊ नये असं सांगत ही धनंजय मुंडेंसाठी शरमेची बाब आहे. मात्र, गरज पडली तर मी महादेव मुंडेंच्या पत्नीच्या पाठीशी उभं राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुंबईत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे मोदी आणि फडणवीस यांनी उद्घाटन केले. हिंदू आणि मराठ्यांच्या नावाखाली यांना सत्ता लागते. तुम्ही स्मारक बनवू शकले नाही, त्यामुळे तुमचा निषेध म्हणत जरांगे यांनी मोदी आणि फडणवीस यांचा निषेध नोंदवला आहे. राज्यातील भावनेशी जाणून बुजून तुम्ही खेळतायत. यांचं भूमिपूजन फक्त नाटक आहे. तातडीने स्मारकाचं काम सुरु करा, शिवाजी पार्कला छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नामकरण करा, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

Manoj Jarange’s statewide chain hunger strike suspended for 15 days

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023