Amit Shah : अनेक गृहमंत्री झाले, पण कुणालाही तडीपार केलंल नाही; पवारांचा अमित शहांवर पलटवार

Amit Shah : अनेक गृहमंत्री झाले, पण कुणालाही तडीपार केलंल नाही; पवारांचा अमित शहांवर पलटवार

Amit Shah

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Amit Shah  देशात अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार केलेलं नव्हतं. अमित शाह यांनी माझ्यावर केलेली टीका मला जिव्हारी लागली नाही कारण अमित शाह काही नोंद घेण्यासारखी व्यक्ती नाही. अमित शाह यांनी गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा त्यांनी बाळासाहेबांचा आसरा घेतला अशा शब्दांत शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर पलटवार केला आहे.Amit Shah

शिर्डीतील भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं,असे ते म्हणाले होते.

शरद पवार म्हणाले, देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य होतं की त्यापैकी कोणालाही कधी त्यांच्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हतं. तो प्रसंग कधी या राज्यकर्त्यांवर आला नाही. त्यामुळे गृह खातं आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रशासकांची आज मला आठवण होत आहे. असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.



या देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, स्वातंत्र्यानंतर अत्यंत प्रभावी आणि सर्व देशाचं राज्यांना एकत्रित करण्याचं काम सरदार पटेल यांनी केलं. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी देशाचं गृहमंत्री म्हणून सर्वांनी अनुभवलं. महाराष्ट्राचं योगदान होतं. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचं गृहमंत्री होते. या पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली. आपलं शेजारचे गुजरात आणि महाराष्ट्र हे एक राज्य होतं. गुजरातनेही अत्यंत उत्तम प्रकारची ओळख देशाला करून दिली. बाबूभाई म्हणून गुजरातचे कर्तबगार प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते. त्यानंतर माधवराव सोलंकी आणि चिमणभाई पटेल आदी उत्तम प्रशासक होते. ही नावं सांगितली यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आलं नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषण केलं. भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीफार माहिती घेऊन भाषण केले तर लोकांच्या मनात शंकेची स्थिती निर्माण होत नाही,असे शरद पवारांनी म्हटले.

शरद पवार म्हणाले, त्यांना १९७८ सालापासून त्यांना माझी माहिती झाली. १९५८ सालापासून मी राजकारणात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांना माहीत नसेल ७८ साली हे व्यक्ती कुठे होते राजकारणात मला माहीत नाही. पण ७८ साली मी मुख्यमंत्री होतो. त्यात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, प्रमिलाताई आदी कर्तृत्वान लोक, जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. पुलोद सरकारची माहिती घेतली तर यातील सगळ्यांनी राज्यासाठी चांगलं योगदान दिलं. म्हणून मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील गृहमंत्री उपमुख्यमंत्री होते. आणि आडवाणी नगरविकास खात्याचे होते. जनसंघाची पार्श्वभूमी असलेल्यांनी माझ्यासोबत काम केलं. संघात राहून आम्हाला सहकार्य केलं त्यापैकी वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन होते. ही सर्व नेतृत्वाची फळी भाजपने ७८नंतर दिली. नंतरच्या काळात देशात पक्ष वेगवेगळी सत्तेत होती. पण राजकीय पक्षातील नेत्यात सुसंवाद होता. उदाहरणच द्यायचं तर वाजपेयी आणि आडवाणी यांचं नाव घेतलं पाहिजे. हे कर्तृत्ववान लोक होते. ते अतिरेकी भूमिका घेऊन समाजकारण किंवा राजकारण केलं नाही, असेही शरद पवारांनी सांगितले.

भूजला भूकंप झाला. मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधानांनी बोलावली. त्यात एक प्रश्न निर्माण झाला. ही संकटे येत आहेत. अतिवृष्टी आणि महापूर, भूकंपाचं धोरण ठरवलं पाहिजे. त्यासाठी वाजपेयी यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केलं. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याकडे आहे. पण हल्लीच्या गृहमंत्र्यांनी जे भाषण केलं. मी आणि उद्धव ठाकरेंवर जे भाष्य केलं त्यावर न बोललं बरं. मराठीत एक म्हण आहे क कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी अशी म्हण आहे, असा टोलाही शरद पवारांनी लगावला.

उद्धव ठाकरेंबाबत जी भूमिका घेतली ती लोकांनी पाहिली. उद्धव ठाकरे सुद्धा त्यावर कधी तरी त्यांचं मत सांगतील. मला हे माहीत आहे, जेव्हा हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्याला मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील. पण दुर्देवाने पातळी घसरली किती हे सांगायला ही पुरेशी विधानं आहेत. अशा व्यक्तीने जी विधाने केली त्याची नोंद पक्षात किती घेतली हे न सांगितलेलं बरं असं शरद पवार यांनी म्हटले आहे.

Many Home Ministers have been made, but no one has been sacked; Pawar’s counter attack on Amit Shah

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023