अनेक जण खाजवत होते आणि बाळा नांदगावकर म्हणतायत गंगेच पाणी घ्या, राज ठाकरे यांनी उडवली गंगास्नानाची खिल्ली

अनेक जण खाजवत होते आणि बाळा नांदगावकर म्हणतायत गंगेच पाणी घ्या, राज ठाकरे यांनी उडवली गंगास्नानाची खिल्ली

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे मेळाव्यात कुंभमेळ्यातील गंगा स्नानाची खिल्ली उडवली आहे. अनेक जण खाजवत होते आणि हे बाळा नांदगावकर म्हणतायत गंगेच पाणी घ्या. कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार? असा सवाल ठाकरे यांनी केला.

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पिंपरी चिंचवडमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, बाळा नांदगावकर यांनी कमंडलमधून पाणी आणलं ते मी पिणार नाही हे स्पष्ट सांगितलं.सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिलेत. अनेक जण खाजवत होते आणि हे बाळा नांदगावकर म्हणतायत गंगेच पाणी घ्या..आताच कोरोना गेलाय. त्याने तिथं काही केलं की सर्व जण उडी घेतात. त्या गंगेचे पाणी कोण पिणार, श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही. एकही नदी देशात स्वच्छ नाही.

राज कपूरांनी एक चित्रपट काढला. लोकांनी म्हटले ही अशी गंगा असेल तर आम्ही पण आंघोळ करतो. पण नदी काही स्वच्छ झाली नाही. राजीव गांधी पंतप्रधान असल्यापासून नदी स्वच्छ होणार असल्याचे सांगत आहेत. एकही नदी स्वच्छ नाही. तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. परदेशात नदी स्वच्छ आहे तेथील लोक नदीला माता मानत नाही.अंधश्रद्धेतून थोडं बाहेर पडा, थोडं डोकं हलवा.

महिला दिनावर राज ठाकरे म्हणाले, दोन पुरुष एकत्र आले तरी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो..अरे इथे महिला कुठेय. महिला दिन हा जिजाऊच्या नावाने ओळखला पाहिजे. ज्या जिजाऊ यांच्या मनात स्वराज्य होत. त्या जिजाऊनी मुलाकडून स्वराज्य निर्माण केले.

राज ठाकरे म्हणाले, आज राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मते मिळवण्यासाठी तुमची डोके फोडून घेतात, आग लावतात हे आपल्या लोकांना समजत नाही. लोकांची माथी भडकवण्याचे काम करण्यात येत आहे. आपण गुढी पाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलणार आहे.सर्व गोष्टीकडून तुम्हाला गुमराह करण्यासाठी जातीपातीचे विषय काढले जात आहे. सोशल मीडियातून तुमची टाळकी भडकवले जात आहेत.

जाणून बुजून हे उद्योग सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. २० दिवसांवर गुढी पाडव्याचा मेळावा आहे. तिकडे मी दांडपट्टा फिरवणार असेल तर आता चाकू सुरे कशाला काढू. आज मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. सदानंद मोरे सरांनी आताच्या परिस्थितीवर बोलावं म्हणून त्यांना बोलावलं. त्यांची व्याख्याने राज्यभर ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रभू रामचंद्रांना हनुमान भेटला. लंकेत गेले. कुंभकर्णाला मारलं. रावणाला मारलं. सीतामाईला घेऊन आयोध्येला आले. मध्ये त्यांनी एक सेतू बांधला. हे त्यांनी १४ वर्षात केलं. वांद्रे वरळी सी लिंक आपण १४ वर्षात बांधला. कुठे आयोध्या, दंडकारण्य, कुठे लंक सेतूबितू बांधून गेले. हे सर्व १४ वर्षात घडलं असं सांगत आजच्या काळात वांद्रे वरळी सी लिंकला 14 वर्षे लागल्यावरून राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली.

Many people were scratching and Bala Nandgaonkar was saying, “Take Ganga water only,” Raj Thackeray mocked Gangasnan.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023