विशेष प्रतिनिधी
बीड : तुम्ही तुमचा मतदार संघ सांभाळा, आष्टीकडे लक्ष देण्यास आपण समर्थ आहोत, असा टोला आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.
पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यातील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. भाजप नेत्या आणि पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदार संघात सोमवारी सभा घेतली. या सभेत आपले आष्टीवर विशेष लक्ष असणार असल्याचे सांगितले. यावर सुरेश धस म्हणाले, पंकजा ताईंनी यांनी मुळ मतदार संघावर जास्त लक्ष द्यावे. तिकडे सर्व हायजॅक झाला आहे. निवडणुकीत पंकजाताई यांनी आपला केवळे केज हा एकाच मतदार संघ असल्याचे म्हटले होते. मग आता आष्टी हा कसा तुमचा मतदार संघ झाला?
आमदार सुरेश धस म्हणाले, आष्टीवर त्यांनी गेल्या निवडणुकीत खूप प्रेम केले होते. आजच्या कार्यक्रमातही त्यांचे ज्याच्यावर प्रेम असतील ते लोकच त्या ठिकाणी आले असतील. या कार्यक्रमात शिट्टीवाले, घड्याळ्यावाले हजर असतील. एकवेळा तुम्ही कॅमेरा उपस्थित लोकांवर फिरवा. आष्टीतील भाजपच्या कार्यकर्त्यांवर आणि भाजपच्या लोकांवर प्रेम करण्यास मी समर्थ आहे. त्यांनी त्यांच्यावर प्रेम करु नये, अशी माझी विनंती आहे.
सुरेश धस म्हणाले, पंकजा ताईंनी यांनी मुळ मतदार संघावर जास्त लक्ष द्यावे. तिकडे सर्व हायजॅक झाला आहे. निवडणुकीत पंकजाताई यांनी आपला केवळे केज हा एकाच मतदार संघ असल्याचे म्हटले होते. मग आता आष्टी हा कसा तुमचा मतदार संघ झाला? पंकजा मुंडे यांनी जास्तीत जास्त लक्ष त्यांच्या केजमधील राखेवर द्यावे, वाळूवर द्यावे, त्यांच्या मतदार संघात गायरान जमीनी हडप केल्या गेल्या आहेत, तिकडे द्यावे. आमच्या मतदार संघावर लक्ष देऊ नये.
MLA Suresh Dhas exhorts Pankaja Munde
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन




















