विशेष प्रतिनिधी
नागपूर : Mohan Bhagwat’ “ज्यांच्या खांद्यावर भारताचे भवितव्य आहे तो हिंदू समाज आता मोठ्या प्रमाणावर जागृत होत असून त्याचे सकारात्मक परिणाम देशभरात दिसू लागले आहेत. सध्याच्या अशांत आणि युद्धग्रस्त जगाला खऱ्या अर्थाने भारताची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्गा’च्या समारोप कार्यक्रमात देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे विचार मांडले.Mohan Bhagwat’
या कार्यक्रमाला देशातील आघाडीचे उद्योगपती आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित कुमारमंगलम बिर्ला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात भागवत यांनी जागतिक राजकारण, भारताची भूमिका, हिंदू समाजाचे संघटन आणि संघाच्या आगामी वाटचालीवर सविस्तर भाष्य केले.Mohan Bhagwat’
भागवत म्हणाले की, आजच्या जागतिक व्यवस्थेत शक्तिशाली राष्ट्रांची मक्तेदारी दिसून येते. मोठी राष्ट्रे इतर देशांच्या भूभागावर कब्जा करतात, युद्ध छेडतात किंवा बॉम्बहल्ले करतात, तर दुर्बल राष्ट्रांना त्यांचे ऐकण्याशिवाय पर्याय राहत नाही. अशा परिस्थितीत भारताने आर्थिक, सामाजिक आणि सामरिकदृष्ट्या अधिक सक्षम बनणे आवश्यक आहे.Mohan Bhagwat’
“जेव्हा भारत एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहील, तेव्हा जगातील दडपशाहीची ही व्यवस्था बदलण्यास सुरुवात होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या जगातील अनेक भागांमध्ये युद्ध आणि अस्थिरतेचे वातावरण आहे. त्याचे परिणाम भारतावरही होत असून तेलाच्या किंमतींपासून ते जागतिक व्यापारापर्यंत अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. मात्र अशा काळात संकटांची भीती बाळगण्याऐवजी भारताने स्वतःच्या शक्तीची जाणीव ठेवून पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
“आज जगाला शांतता, समन्वय आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या भारताची गरज आहे. भारताचे विचार आणि जीवनमूल्ये जागतिक स्तरावर अधिक महत्त्वाची ठरत आहेत,” असे ते म्हणाले.
सरसंघचालकांनी हिंदू समाजाच्या संघटनावर विशेष भर दिला. समाजातील जातिभेद, विभागणी आणि परस्पर अविश्वास दूर करून एकसंघ समाज उभारणे हे संघाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हिंदू समाज हा या देशाचा आधारस्तंभ आहे. देशासाठी जबाबदारी स्वीकारणारा आणि समाजहिताला प्राधान्य देणारा हा समाज आता मोठ्या प्रमाणावर जागृत होत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम विविध क्षेत्रांत दिसत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सध्या शताब्दी वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून समाजाशी अधिक जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती भागवत यांनी दिली.
ते म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर घराघरात संपर्क साधत असून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य करत आहेत. संघटित समाजच राष्ट्रनिर्मितीचा पाया ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या ऐतिहासिक गुलामगिरीचा उल्लेख करताना भागवत म्हणाले की, ज्यांनी भारतावर दीर्घकाळ राज्य केले ते भारतीयांपेक्षा श्रेष्ठ नव्हते. मात्र भारतीय समाजाने स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव गमावल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला.
“आता पुन्हा एकदा राष्ट्राला वैभवाच्या मार्गावर नेण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे. संघ कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता केवळ राष्ट्रहितासाठी कार्य करत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विघातक शक्तींविरोधात सावध राहण्याचे आवाहन
देशात काही शक्ती समाजात फूट पाडण्याचा आणि भारताच्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा इशाराही त्यांनी दिला. अशा प्रवृत्तींविरोधात समाजाने जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
‘भारताची ताकद जगाच्या कल्याणासाठी वापरली जाईल’
भारत हा धर्मप्रधान आणि मूल्याधिष्ठित देश असल्याचे सांगत भागवत म्हणाले की, भविष्यात भारताची ताकद दुर्बल राष्ट्रांवर अन्याय करण्यासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी वापरली जाईल. तेव्हाच खरी जागतिक शांतता प्रस्थापित होईल.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी नागरिकांना संघाच्या कार्याची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी शाखांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. गणवेशधारी स्वयंसेवक म्हणून किंवा सहयोगी कार्यकर्ते म्हणून राष्ट्रनिर्मितीच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
Hindu society is awakening, the world needs India; RSS chief Mohan Bhagwat’s opinion
महत्वाच्या बातम्या