विशेष प्रतिनिधी
अकोला : Dr. Shripal Sabnis अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.नथुराम गोडसे नीच आणि नालायक ब्राह्मण होता. त्यांने महात्मा गांधींमधील महात्म्याला ठार मारले. आजचे हिंदुत्ववादी त्याच नथुराम गोडसेचे पुतळे व मंदिरे उभारत आहेत. हे धर्माचे नसून धर्माच्या घातकपणाचे कार्य आहे, अशी टीका त्यांनी केली.Dr. Shripal Sabnis
रविवारी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे एका कार्यक्रमात बोलताना सबनीस म्हणाले, ‘‘नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण. या माणसाने महात्मा गांधी यांच्यामधील महात्म्याला मारलं. त्याचे हे हिंदुत्व आजचे हिंदुत्ववादी डोक्यावर, कपाळावरती टीळा लावून फिरत आहेत. नथुराम गोडसेचे पुतळे, मंदिरे उभारत आहेत. हे धर्म कार्य नव्हे, तर हे धर्माचे घातकपण आहे. अशा धर्मापासून देशाचे संरक्षण करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे विवेकी धर्मनिष्ठ हा महत्त्वाचा विचार आहे. मी पुर्वजांच्या पापांबद्दल आज तुमच्या सर्वांसोबत माफी मागतो.’’
डॉ. श्रीपाल सबनीस पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
Nathuram Godse vile and worthless Brahmin, Controversial statement of Dr. Shripal Sabnis again
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…