विशेष प्रतिनिधी
नाशिक : Neelam Gorhe विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले, पण मला उमेदवारी दिली नाही. माध्यमांकडे जाण्याची धमकी दिल्यावर अर्धेच पैसे परत केले असा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे नेते आणि नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनीकेला आहे. Neelam Gorhe
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळते असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुलाखतीत बोलताना केला होता. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. खासदार संजय राऊत यांनी निर्ल्लज, विश्वासघातकी बाई अशी टीका त्यांच्यावर केली आहे. नीलम गोऱ्हे यांनी कशाप्रकारे कार्यकर्त्यांची लूटमार केली, याविषयी विनायक पांडे आणि अशोक हरनावळ यांना विचारा, असे संजय राऊत म्हणाले होते.
त्यानंतर पांडे यांनी गोऱ्हे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की , मी शिवसेनेचा सात वर्षे शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपमहापौर, महापौर होतो. पण शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही पदासाठी माझ्याकडून एक रुपयाही मागितला नाही. फक्त त्यांनी माझं काम पाहून मला पदं दिली. शिवसेनेने मला जे दिलं ते भरभरून दिलं. पण नक्की सांगेन की विधानसभेच्या निवडणुकीत या बाईने माझ्याकडून पैसे घेतले होते. राज्यात अनेक कार्यकर्ते पुढे येऊन सांगतील की या बाईंनी काय काय केलं आहे.
मी मध्य नाशिकमधून इच्छूक होतो. अजय बोरास्ते इच्छूक होते. त्यावेळी नीलम गोऱ्हेंचा कार्यकर्ता माझ्याकडे आला. त्यांनी मला ताईंकडे नेलं. ताईंशी चर्चा करून दिली. माझी पार्श्वभूमी सांगितली. ताईंनी सांगितलं की तिकिटाकरता इतके इतके मला द्यावे लागतील. त्यातील काही पैसे मी त्यांना पोहोचवले. पण तरीही अजय बोरास्ते यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मी माझे पैसे मागितले. पण त्यांनी आज-उद्या देतो करत चालढकल केली. शेवटी मी त्यांना सांगितलं की पत्रकार परिषद घेऊन मी माध्यमांना माहिती देईन. तेव्हा त्यांनी आमदार निवास येथे काही रक्कम दिली. त्यातही कमी रक्कम दिली, असा आरोप पांडे यांनी केला.
मुळात त्यांनी जो विषय दिल्लीत मांडला, तो मांडण्याचा व्यासपीठ ते नव्हतं. तिथे मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. त्यामुळे आम्हाला या बाईची किव येते. मी ४३ वर्षे शिवसेनेत आहे. मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. पण काही नवीन कार्यकर्ते आहेत, ज्यांना पदाची अपेक्षा असते, त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं जात नाही. ज्या ज्या ठिकाणी नीलम गोऱ्हे संपर्क प्रमुख होत्या, तिथल्या कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही, असेही विनायक पांडे म्हणाले.
Neelam Gorhe had taken money for candidature in the Legislative Assembly, Thackeray group leader alleged
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…