शेंबड्यासारखे रडत बसलो नाही, मेहनत केली आणि कामाला लागलो, नितेश राणे यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

शेंबड्यासारखे रडत बसलो नाही, मेहनत केली आणि कामाला लागलो, नितेश राणे यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपने पराभवानंतर शेंबड्यासारखे रडत न बसता मेहनत केली, काम केले आणि हरियाणा, महाराष्ट्रात सत्ता आणून दाखवली. आमच्या काही उमेदवारांना अगदी कमी मते मिळाली, पण आम्ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीप्रमाणे रडत बसलो नाही, असा हल्लाबोल मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेवर जोरदार टीका करताना ‘थ्री इडियट्सची पत्रकार परिषद’ असे ते म्हणाले. ते त्यातील दोन नेते ईव्हीएमच्या मदतीने निवडून आले आहेत .राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे. तिसरे नेते, संजय राऊत, बॅकडोअरने निवडून आले आहेत. मग ईव्हीएमवर निवडून येणारे हे लोक यंत्रणेबद्दल तक्रारी करत आहेत, यांना विश्वासार्हता आहे का?” असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

ईव्हीएमवर विश्वास नाही, तर त्यांनी खासदारकीचे राजीनामे द्यावेत आणि बॅलेट पेपरवर निवडून येऊन दाखवावे,” असे खुले आव्हानही राणेंनी दिले.

खारघरमध्ये एका हिंदू तरुणावर झालेल्या हल्ल्यावर बोलताना राणे म्हणाले, “त्या तरुणाने गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती आणि टी-शर्टवर ‘श्रीराम’ लिहिले होते. त्याच्यावर मोहम्मद सहा नावाच्या तब्लीगी जमातच्या प्रवक्त्याने हल्ला केला. तब्लीगी जमात ही हिंदू विरोधी कार्यक्रम घेत असून अशा कार्यक्रमांवर बंदी घालावी आणि याची चौकशी करावी,” अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांविरोधात कठोर भूमिका घेत नितेश राणे म्हणाले, “महाराष्ट्रात ही ‘घाण’ आम्हाला नकोच आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार ही घाण साफ करणार आहे. जे ज्या राज्यात जातात, तिथे अस्थिरता निर्माण करतात. यांना आश्रय देणाऱ्यांनीही यातून धडा घ्यायला हवा. आम्ही महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी ही कारवाई करूच.”

Nitesh Rane’s attack on Rahul Gandhi, did not cry like a baby

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023