Nilesh Rane नीतेशने जपून, सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले, निलेश राणे यांचा बंधू नितेश यांना सल्ला

विशेष प्रतिनिधी

कणकवली: नीतेशने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी आपले बंधू आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांना दिला आहे. Nilesh Rane

धाराशिव येथील भाजपच्या मेळाव्यात मंत्री नीतेश राणे यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद पुन्हा समोर आला आहे. नितेश राणे भारतीय जनता पक्षात तर निलेश राणे शिवसेना शिंदे गटात आहेत. Nilesh Rane

निलेश राणे नितेश राणे यांना सल्ला देताना म्हणाले, सभेत बोलणे सोपे आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असले पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.



शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधत नीतेश राणे यांनी, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा, असे म्हटले होते. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सध्या वाद सुरु आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर समितीच्या कामांवर स्थगिती देण्यात आली. यावर बोलताना नीतेश राणे यांनी मेळाव्यात सांगितले की, कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले, तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत.

सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा. या विधानामुळे महायुतीतील शिवसेना शिंदे गट नाराज असल्याचे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी महायुतीतील एकोपा टिकवण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Nitesh spoke carefully and with awareness of everything, Nilesh Rane’s advice to his brother Nitesh

महत्वाच्या बातम्या