Tulsi garland मुख्याध्यापिकेने काढला तुळशी माळ घालण्यास बंदीचा फतवा, सोशल मीडियावर संतापानंतर माफीनामा

विशेष प्रतिनिधी

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे शाळांमध्येही हिंदू प्रतीकांना विरोध सुरू झाला आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बारासत सदर येथील नवपल्ली जोगेन्द्रनाथ बालिका विद्यालयात हिंदू विद्यार्थिनींना शाळेत तुळशी माळ घालण्यास बंदी घालण्यात आली होती. या आदेशामुळे पालक आणि विद्यार्थिनींमध्ये संतापाची लाट उसळली होती. सोशल मीडियावर या फतव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यानंतर हा फतवा मागे घेण्यात आला. Tulsi garland

मुख्याध्यापिका इंद्राणी दत्ता चक्रवर्ती यांनी दिलेला हा ‘फतवा’ लवकरच सोशल मीडियावर वादग्रस्त ठरला, प्रचंड टीकेनंतर इंद्राणी दत्ता चक्रवर्ती यांना आपला आदेश मागे घेण्यास भाग पडल्या.

या प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात चक्रवर्ती विद्यार्थिनींना थेट आदेश देताना ऐकू येते, “तुळशी माळ घालून शाळेत येणे प्रतिबंधित आहे.” या वक्तव्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप नोंदवत चक्रवर्ती यांच्यावर कारवाईची मागणी केली.



प्रसारमाध्यमांशी बोलताना इंद्राणी दत्ता चक्रवर्ती यांनी माफी मागितली आणि सांगितले की, “माझे शब्द चुकीच्या प्रकारे समजले गेले. मी कृष्णभक्त आहे आणि मला वाटले की शालेय गणवेशावर तुळशी माळ घालणे हे त्या पवित्र वस्त्राचा अपमान ठरू शकतो.” त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांचा हेतू धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता.

“कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करते,” असे सांगून मुख्याध्यापिकांनी आपला आदेश तात्काळ मागे घेतला आहे. या निर्णयामुळे हिंदू विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक समाधान व्यक्त करत आहेत.

दरम्यान, अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हिंदूंच्या धार्मिक चिन्हांवर बंधने घालणे,आणि मग माफी मागणे ही एक नव्याने उगम पावणारी धर्मनिरपेक्षतेची विकृती आहे.” काही संघटनांनी यावर शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Principal issues fatwa banning wearing Tulsi garland, apologizes after outrage on social media

महत्वाच्या बातम्या