विशेष प्रतिनिधी
बीड : वाल्मीक कराड आणि माझे चांगले संबंध होते. पण तो अशा पद्धतीने माणसं मारायला लागला तर त्याच समर्थन करायच का? मैत्री आहे म्हणून असं केल्यानंतर सोबत राहायच का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
संतोष देशमुख यांच्या खुनात माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा डाव आहे , असा आरोप करत वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. आष्टीचा जावई येथे आणून बसविला असल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस यांच्यावरही निशाणा साधला आहे. यावर आमदार धस म्हणाले,मी वाल्मिक कराड यांना भेटलो नाही. त्यांचे आणि माझे काही वाईट नव्हतं. त्यांचे आणि माझे चांगले संबंध होते. पण वाल्मिक कराड अशा पद्धतीने माणसं मारायला लागला तर त्याच समर्थन करायच का? मैत्री आहे म्हणून असं केल्यानंतर सोबत राहायच का? त्या माऊलीच्या बाबत आम्हाला काही बोलायच नाही
कराड समर्थकांनी परळी बंद केला आहे. आमदार सुरेश धस यांच्या विरोधातही अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. यावर माणूस जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ बीड, परळी बंद करा म्हणणं कितीपत योग्य आहे? असा सवाल आमदार सुरेश धस यांनी केला. ते म्हणाले, नवीन पायंडा पडेल. जो जेलमध्ये जाईल त्याच्या समर्थनार्थ हम उसके साथ है असं होईल. कदाचित आकाची लोक आली तर मुंबई सुद्धा बंद करु शकतात.
रोहित कांबळे हा वाल्मिक कराडच्या हाताखालचा माणूस आहे, काही मदत लागत असेल म्हणून त्यांनी नाव घेतलं असेल, असेही ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. यावर आमदार धस म्हणाले, अजित पवार त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते काही असेल ते जाहीर करतील. विष्णू चाटे जेल मध्ये गेल्यानंतर बरखास्त करावच लागेल. ते पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या पक्षाचे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल असतील.
मंत्री पद नाही मिळालं म्हणून मी नाराज नाही असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मी दुसऱ्या दिवसापासून सांसदीय कामाला लागलो. मी नम्रपणे सांगतो, पुढची पाच वर्षे विधानमंडळाच काम करेन तेही सर्वात उजवं कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करेल.
बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातही वाल्मिक कराड प्रमुख संशयित आहे. सीआयडीने खंडणी प्रकरण व संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिकची चौकशी करण्यासाठी त्याची सीआयडी कोठडी मागितली होती. मात्र, न्यायमूर्तींनी न्यायालयीन कोठडी दिली आहे. खंडणी प्रकरणात त्याची अजून १४ दिवस चौकशी केली जाईल.\
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड प्रमुख आरोपी असल्याचा दावा विरोधी पक्षांमधील नेते व मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला आहे.
Question by MLA Suresh Dhas
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती