Radhakrishna Vikhe Patil राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर मोहिते पाटलांना दिली खुर्ची

विशेष प्रतिनिधी

सांगोला: माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. एका कार्यक्रमात विद्यमान खासदार असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांना कार्यक्रमात खुर्ची देण्यात आली नाही. अखेर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हस्तक्षेप केल्यानंतर खासदारांना खुर्ची देण्यात आली.

सांगोला ( येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. माढ्याचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना बसायला खुर्चीच मिळाली नाही. तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मात्र खुर्चीवर बसले होते.

बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ आज सांगोल्यात झाला. या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, दीपक साळुंखे उपस्थित होते.

दरम्यान, भूमीपुजनाचा कार्यक्रम सुरु होताना खुर्चीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील हे चौघे बसल्याने विद्यमान खासदारांना बसायला खुर्ची मिळाली नाही.

विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील या दोघांनाही कार्यक्रमादरम्यान उभे राहावे लागले. मात्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि दीपक साळूंखे हे उभे असल्याचे लक्षात आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्ती करत खुर्ची उपलब्ध करुन देण्यास सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil gave the chair to Mohite patil

महत्वाच्या बातम्या