राहुल गांधी शोभतात अफजलखान फॅन क्लबचे अध्यक्ष, डॉ.ज्योती वाघमारे यांची टीका

राहुल गांधी शोभतात अफजलखान फॅन क्लबचे अध्यक्ष, डॉ.ज्योती वाघमारे यांची टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहणारे अफजलखान फॅन क्लबचे अध्यक्ष शोभतात. राहुल गांधीच्या मेंदूला मूळव्याध झालाय का? असा सवाल शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे यांनी केला आहे.

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपलं शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भिडपणा आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्रोत राहील.”सामान्यपणे जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये आदरांजली असा उल्लेख केला जातो.

यावर राहुल गांधी यांना टोला मारताना वाघमारे म्हणाल्या, राहुल गांधीना चौथीच्या इतिहासाचे पुस्तक पाठवत आहे कारण चौथीच्या पोराइतकीही अक्कल त्यांना नाही. त्यांचे आजोबा जवाहरलाल नेहरूंपासून चालत आलेला शिवद्वेष त्यांनी दाखवला आहे.महाराष्ट्राची जनता काँग्रेस पक्षालाच श्रद्धांजली वाहेलराहुल गांधींनी यापुढे अफजलखान, शाहिस्ते खानाच्या नावावर मते मागावीत.

राहुल गांधी यांच्यावर मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनीही सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, औरंगजेबाच्या पिल्लावळीकडून आणखीन काही अपेक्षा नाही. हे हिरवे साप आहेत, औरंगजेबाच्या विचारावरती हे राजकारण करतात. नेहमी आमच्या शिवरायांचा यांना द्वेषच दिसणार. राहुल गांधींनी देशाची शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे.

भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. राहुल गांधींनी ही पोस्ट डिलीट केली नाही तर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असं भातखळकरांनी म्हटले आहे. महापुरुषांच्या बाबतीत असा खोडसाळपणा खपवून घेतला जाणार नाही असे भातखळकर म्हणाले.

Rahul Gandhi is President of Afzal Khan Fan Club, Criticism of Dr. Jyoti Waghmare,

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023