विशेष प्रतिनिधी
पुणे: ते वेगवेगळे विषय काढून लक्ष विचलित करतील, आपण मात्र #SaveHND मुद्द्यावर ठाम राहायचं. समस्त पुणेकर सगळ्या जैन समाजाच्या सोबत आहेत, कारण आज वेळ जैन समाजावर आली आहे. याकाळात आपण एकत्र नाही आलो तर उद्या सर्वांची धार्मिकस्थळे अशीच लाटली जातील, असा इशारा माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी दिला आहे. , I Repeat … एकही वीट हलवू द्यायची नाही, असेही धंगेकर यांनी म्हटलं आहे. Ravindra Dhangekar
कोथरुड येथील जैन बोर्डिंग जागेच्या विषयावरुन प्रकरण चांगलच तापलं असून धंगेकर यांनी पुन्हा एक पोस्ट केली आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग वसतीगृहाची जागा शिवाजी नगर येथे असून त्याठिकाणी दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्र्वेतांबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. मात्र या जागेवर विश्वस्त नियंत्रण ठेवून आहेत आणि नवीन विकास करण्यास इच्छूक होते.
मात्र समाजातील काही लोकांनी विकासाला विरोध केला होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच ही जागा चर्चेत आली होती. जागा परस्पर हडप करून तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. तसेच पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागेच्या विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली आहे. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे आहेत, असा आरोपही करण्यात येत आहे.
या प्रकरणात गोखले कन्स्ट्रक्शन या कंपनीचं नाव समोर आलं. यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची गोखले कन्स्ट्रक्शन या कंपनीसोबत भागीदारी असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान माजी आमदार आणि शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन आपण आपल्या मुद्द्यावर ठाम राहायचं, एकही वीट हलू द्यायची नाही, असे म्हटले आहे. दरम्यान माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन आपण आपल्या मुद्द्यावर ठाम राहायचं, एकही वीट हलू द्यायची नाही, असे म्हटले आहे.
Ravindra Dhangekar warns over Jain Boarding House controversy
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा