विशेष प्रतिनिधी
पुणे : उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानंतर मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून तो आता गोव्यात पोहोचला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुढील 48 तासांत दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात पावसाची शक्यता अधिक आहे. दरम्यान, विदर्भात सध्या तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसदरम्यान कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र 10 जूननंतर तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून खरीप हंगामाच्या तयारीसाठीही ही परिस्थिती अनुकूल ठरणार आहे.
मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. विशेषतः कुडाळ तालुक्यात विविध भागांत पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 ते 20 मि.मी. पावसाचा अंदाज व्यक्त केला असून जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीवर पावसासाठी अनुकूल स्थिती तयार होत असल्याचेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्यापासून दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचे स्वागत केले
कृषी विभागाने शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खरीप पेरणीसाठी कोणतीही घाई करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा अंतिम निर्णय घ्यावा, असे नमूद केले. अपुऱ्या पावसामुळे बियाण्यांचे नुकसान होण्याचा धोका टाळण्यासाठी संयम आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
Relief for Maharashtra… Monsoon to hit Maharashtra in the next 48 hours
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन