विशेष प्रतिनिधी
मुंबई : धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे जर मुस्लीमांना त्रास होणार असेल तर तो हिंदूंना, बौद्धांना,जैन, पारशी, शीख आणि ख्रिश्चनांनादेखील होईल, अन् होणार नसेल तर कोणालाही होणार नाही, पण कालचे बिले हे सर्व धर्मांना त्रास देणारे आहे असे उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. Bhaskar Jadhav
भास्कर जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडले आणि त्याचबरोबर शिवसेनेची भूमिका म्हणून मी त्यालार पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेची भूमिका म्हणून आम्ही त्यांचे समर्थन केले आहे, त्यातून सरकारची लबाडी आमच्या तात्काळ लक्षात आली होती. आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही ती तात्काळ लक्षात आली. बाहेर चर्चा करताना सत्ताधाऱ्यांचे उथळ वक्तव्य करणारे काही लोकं पाळले गेले आहेत त्यांच्याकडून हे मुस्लीमांच्याविरोधात आणि हिंदूच्या रक्षण करणारे विधेयक आहे अशा चर्चा घडवल्या जात होत्या. प्रत्यक्षात बिलामध्ये कुठेही तसे काहीही नाही.
जितेंद्र आव्हाडांकडून काल एक शब्द चुकीचा गेला तो जायला नको होता. त्याचे मी समर्थन करणार नाही. त्यांना त्यांचवेळी मी माफी मागायला सांगत होतो पण सत्ताधारी पक्षाला जे अपेक्षित होते, त्यांना या बिलच्या माध्यमातून सभागृहात हिंदू-मुस्लीम प्रकारची राडेबाजी करायची होती, ते करायला संधी मिळाली. जितेंद्र आव्हाडांच्या एका वाक्यामुळे सत्ताधाऱ्यांना सभागृहात राडा घालायला संधी मिळाली हे खरे आहे, अशी कबुली भास्कर जाधव यांनी दिली.
भास्कर जाधव म्हणाले की, अबु आझमी या बिलाबद्दल काय म्हणता यावर बोलणे मला काही महत्त्वाचे वाटत नाही. पण या बिलामुळे टार्गेट झाले तर सर्वच धर्म टार्गेट होतील, नाहीतर कुणीच टार्गेट होणार नाही. दोन धर्मातील मुले-मुली लग्न करू इच्छित असतील तर त्यांना 60 दिवस आधी अधिकाऱ्याला सांगावे लागेल. असे लग्न लपवाछपवी करत होत असतात. यामुळे समाजात मोठा राडा होऊ शकतो, हे एका धर्मासाठी नाही तर सर्वच धर्मांसाठी त्रासदायक होऊ शकते.
Religious Freedom Bill Will Trouble All Faiths, Alleges Bhaskar Jadhav
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास