विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांना महाराष्ट्र सरकारच्या युवा आणि क्रीडा धोरण समितीतून हटवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार आणि नेते रोहित पवार यांनी केली आहे. ही मागणी महाविद्यालयातील एका दलित विद्यार्थ्याने केलेल्या जातीय भेदभावाच्या आरोपानंतर पुढे आली आहे. Rohit Pawar
विद्यार्थ्याने मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथून बीबीए पदवी घेतली होती. त्याने आरोप केला की, महाविद्यालय प्रशासनाने त्याच्या नोकरीसाठी आवश्यक असलेली दस्तऐवज पडताळणीची कागदपत्रे जाणीवपूर्वक रोखली, ज्यामुळे त्याची परदेशातील नोकरीची संधी हातची गेली. त्यामागे जातीय भेदभावाचा हेतू असल्याचा त्याचा दावा आहे.
दरम्यान, कॉलेज प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले असून, कागदपत्रे संबंधित यूके-आधारित नियोक्त्याला पाठवली असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थ्याची नोकरीची संधी रद्द झालेली नसल्याचे सांगत आरोप “बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे” असल्याचे म्हटले आहे.
तथापि, या स्पष्टीकरणानंतरही रोहित पवारांनी तीव्र भूमिका घेत, “ही मनुवादी, जातीय मानसिकता असलेल्या लोकांची विचारसरणी आहे. अशा लोकांना युवक धोरण तयार करणाऱ्या सरकारी समित्यांमध्ये स्थान असू नये,” असे सांगत ही सरकारची समिती आहे जी युवकांसाठी रोजगार, उद्योजकता आणि क्रीडा विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी धोरण आखते. पण ज्या लोकांमुळे जातीयतेच्या कारणावरून एखाद्याची नोकरी जाते, अशांना अशा समित्यांवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे म्हटले आहे.
त्यांनी राज्य सरकारला आवाहन केले की, निवेदिता एकबोटे आणि इतर वादग्रस्त सदस्यांना तात्काळ समितीतून हटवून समानता आणि प्रगतीचा विचार करणाऱ्या व्यक्तींचा समावेश करून समितीचे पुनर्गठन करावे.
Rohit Pawar demands removal of Modern College Principal Nivedita Ekbote from Youth Policy Committee
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा