विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rohit Pawar ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावरून शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राऊतांना चांगलेच सुनावले आहे.Rohit Pawar
आमदार रोहित पवार म्हणाले, दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला.”
दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार दिल्यानंतर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुकही केले. एकनाथ शिंदेंनीही शरद पवार यांच्या गुगलीचा उल्लेख करत मला त्यांनी कधीच गुगली टाकली नाही, असे म्हटले.यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली असून शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पुरस्कार द्यायला नको होता, अशी भूमिका मांडली आहे.
Rohit Pawar questioned the sophistication of Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने 22फेब्रुवारी पासून आंदोलन
- Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल यांचा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर डोळा
- Shashi Tharoor शशी थरूर बनले पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे चाहते, ‘या’ मुद्द्यावर झाले सहमत
- Chief Minister Delhi दिल्लीला पुन्हा महिला मुख्यमंत्री मिळेल का? भाजपच्या संभाव्य उमेदवार कोण आहेत जाणून घ्या