Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले, आता मी आणि उध्दव ठाकरे तिकडे चाललाे एवढीच अफवा उडणे बाकी

Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले, आता मी आणि उध्दव ठाकरे तिकडे चाललाे एवढीच अफवा उडणे बाकी

Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी

Nashik News: मागील तीन-चार महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटातील हा नेता तिकडे चालला, अशा अफवा उठवल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतही तिकडे चालले एवढीच अफवा उठवणे आता बाकी आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी अनेक नेते शिवसेना (ठाकरे) सोडणार यावरुन विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

नाशिक येथीव शिवसैनिकांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, कितीही अफवा पसरवल्या तरी नाशिकमधील शिवसैनिक जागचा हलला नाही. शिवसैनिकांनी संघर्ष कायम ठेवत घाव झेलत राहिले. अशी स्थिती बाळासाहेबांनीही बघितली आहे. त्यामुळे आता चर्चा न करता पक्ष मजबुतीसाठी ताकद दाखवून द्या, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत यांनी आज रामनवमीनिमित्त काळाराम मंदिर येथे भेट देत श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काळाराम मंदिरात यायला पाहिजे. होते. पंढरपूरमध्ये जशी शासकीय पूजा होते तशीच रामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात शासकीय पूजा झाली पाहिजे. कारण काळाराम मंदिराला सामाजिक चळवळीचा इतिहास आहे, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना डिवचले. तसेच ते म्हणाले की, गेल्या 20-25 वर्षांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काळाराम मंदिरात आलेले मला दिसले नाही, ते काळाराम मंदिरात का येत नाही, असा प्रश्न पडला असल्याचेही खासदार संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut said, Now I and Uddhav Thackeray walked there, only rumors are left to fly.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

Warkaris

Warkaris : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मुर्तरूप, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत आयोजित शिबीराचा १५ हजाराहून अधिक वारकऱ्यांनी घेतला लाभ

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023