विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीझ दिलाय कि एक पद मिळायचे असा आरोप विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला होता, यावर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार बेभान झाल्याने त्यांची जीभ घसरली. डॉ. गोऱ्हे यांच्यावर निर्लज्ज बाई अशी टीका त्यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी मला प्रश्न विचारला होता, ही कोणही बाई पक्षात आणली तुम्ही… नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य म्हणजे विकृती. नीलम गोऱ्हे म्हणजे निर्लज्ज बाई… काही लोकांच्या मर्जीने त्या आल्या अन् चार वेळा आमदार झाल्या. पण या बाईंचं कर्तृत्व काय? पुण्यातील अशोक हर्नल यांची मुलाखत घ्या मग तुम्हाला मर्सडिज प्रकरण काय आहे हे तुम्हाला कळेल.
नीलम गोऱ्हे विश्वासघाती बाई आहे. हा सभागृहाचा विषय नाही, त्यामुळे हक्कभंगाविषयी मला सांगू नका. महाराष्ट्राने नीलम गोऱ्हेवर हक्कभंग आणला पाहिजे. बाळासाहेबांनी तुम्हाला आमदार केलं नाही. नेत्यांवर टीका करण्यासाठी संमेलन भरवलं गेलं का? नीलम गोऱ्हे लक्षवेधी घ्यायला किती पैसे घेतात? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी केला
संजय राऊत म्हणाले, “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्यक्रम महामंडळ ठरवते, तर आयोजक हे सतरंज्या उचलायला असतात. उषा तांबेंनी संमेलनाचे कार्यक्रम ठरवले. त्यांचे पती बांधकाम विभागाचे सचिव होते. सगळ्यात भ्रष्ट खाते आहे. गोऱ्हेंनी रविवारी केलेले वक्तव्य ही विकृती आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘ही कोणती बाई तुम्ही पक्षात आणली आहे?’ तरी काही लोकांच्या मर्जीखातेर आल्या, चारवेळा आमदार झाल्या. जाताना ताटात घाण करून गेल्या.
बाईचं विधान परिषदेतील कर्तृत्त्व समजून घ्यायचे, तर पुण्यातील महापालिकेतील आमचे गटनेते होते, अशोक हरणावळ यांच्याकडून जाणून घ्या. धमक्या देऊन कोणा-कोणाच्या नावावर कोट्यावधी रूपये घेतले, हे जाणून घ्या. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांना उमेदवारी देण्यासाठी या बाईंनी किती पैसे घेतले, हे पांडेंना विचारा. अजून काही नावे दोन दिवसांनी मी देईल,” असं राऊत यांनी सांगितले.
“तुम्ही कोणावर थुंकताय… मातोश्रीवर… तुमची लायकी नसताना चारवेळा आमदार केले. ‘माझे कर्तृत्व असल्या बाळासाहेबांनी आमदार केले,’ असे गोऱ्हे सांगतात. काय तुमचे कर्तृत्त्व होते? गोऱ्हेंना बाळासाहेबांनी आमदार केले नाही. अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब ठाकरे आमदार करत नाही. एक संस्कार आणि संस्कृती असते. पण, तुम्ही अशा प्रकारची विधाने करता, मातोश्री आणि पक्षप्रमुखांबाबत. मुळात उषा तांबेंनी माफी मागायला हवी. उषा तांबेंचे काय काम आहे, माहिती नाही. आम्हाला साहित्य कळते, आम्ही लिहिणारे माणसे आहोत,” असेही राऊत म्हणाले.
Sanjay Raut’s tongue slips, Unconscious criticism on Neelam Gorhe as Shameless lady
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…