विशेष प्रतिनिधी
पुणे : विळ्या भोपळ्याचे सख्य असलेले शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे पुण्यातील नेते भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात एकत्र आलेले आहेत. Shinde – Thackeray
शिवाजीनगर येथील ऐतिहासिक शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगची जागा सरकारमधील काही नेत्यांनी हडपल्याचा आरोप विरोधकांनीमुरलीधर मोहोळ आठवड्याभरापूर्वी केला होता. या प्रकरणात गोखले कन्स्ट्रक्शन या कंपनीचं नाव समोर आलं. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची गोखले कन्स्ट्रक्शन या कंपनीसोबत भागीदारी असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रवींद्र धंगेकर यांच्या मदतीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे धावून आले आहेत.
पत्रकारांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, जैन बोर्डिंगची जागाप्रकरणात एक पुणेकर म्हणून मी रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी आहे. कारण सत्तेत असूनही ते एखादा विषय लावून धरत आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. रवींद्र धंगेकर जर एखादी खरी बाजू मांडत असतील, तर तुम्ही ती स्वीकारायला हवी. ‘भटकी कुत्री’ किंवा अन्य कुठलीही खालच्या पातळीवरील टीका करत असाल तर तुम्ही भाजपावाले लोक तुमची पात्रता दाखवत आहात, असंच म्हणावं लागेल. असे मत व्यक्त करत वसंत मोरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
वसंत मोरे म्हणाले की, जर एखादी व्यक्ती खरं बोलत असेल, तर तुम्ही ते ऐकलं पाहिजे. रवींद्र धंगेकर खोटं बोलत असते तर धर्मादाय आयुक्तांनी त्या व्यवहारावर स्थगिती दिली नसती. आयुक्तांनी स्थगिती दिली आहे, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय. तसेच रवींद्र धंगेकर खरं बोलत असावेत. मी रवींद्र धंगेकर यांना ओळखतो आणि ते अभ्यासपूर्ण माहिती देतात. धंगेकर यांनी जर एखादा विषय हाती घेतला तर ते लावून धरतात. पुण्यातील एखादी व्यक्ती, एखाद्या पक्षाचा पदाधिकारी, या शहराचा नागरिक म्हणून शहरात शांतता राहावी, तसेच शहरातील जमिनी कोणी बळकाऊ नये यासाठी ते प्रयत्न करत असतील, तर आपण त्या व्यक्तीचं समर्थन केलं पाहिजे, अशी भूमिका मोरे यांनी मांडली.
वसंत मोरे म्हणाले की, सदर जमीन ही जैन विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु त्या जागेवर कोणीतरी गोखले नावाचा बांधकाम व्यवसायिक येतो आणि तिथे मॉल बांधायचा प्रयत्न करत आहे. तिथल्या जैन समुदायाला हटवण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्याविरोधात जैन धर्मीय रस्त्यावर उत्तरत असतील, तर त्यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे एक पुणेकर म्हणून मी रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी आहे.
Shinde – Thackeray group leader against BJP’s Muralidhar Mohol
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा