Suresh Dhas : माझ्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचतंय, आमदार सुरेश धस यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

बीड : Suresh Dhas  मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यावर टीकेचे मोहोळ उठले आहे. यावर माझ्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचतंय. आपण या षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा इशारा सुरेश धस यांनी दिला आहे.Suresh Dhas

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. मात्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली. यावरून धस चांगलेच अडचणीत आले आहेत.
यावर आमदार धस म्हणाले, दोन गोष्टी एकत्र केल्या गेल्या. त्यामध्ये एक म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेलो. या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या. चंद्रशेखर बावनकुळे यांची त्याबाबती मधील प्रतिक्रिया आली. त्यानंतर धनंजय मुंडेंना मी भेटल्याचंही टिव्हीवर आलं किंवा ते लीक करण्यात आलं. याबाबत माझं असं मत आहे की याबाबत कोणीतरी व्यवस्थित माझ्याविरोधात षडयंत्र रचतंय. हे षडयंत्र कोण रचतंय हे देखील मला माहिती आहे. ही गोष्ट मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे. हे जे कोण षडयंत्र रचतंय त्याचा पर्दाफाश मी योग्यवेळी करणार आहे.



सुरेश धस म्हणाले, धनंजय देशमुख आणि मस्साजोगकर यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी ठामपणे माझ्यावर विश्वास दाखवला. धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये माणुसकी सोडली. आमची अपेक्षा होती की धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला हवी होती. पण धनंजय मुंडेंही भेटायला आले नाहीत, पंकजा मुंडे देखील भेटायला आल्या नाहीत. पण आम्ही माणुसकी सोडलेली नाही, आम्ही माणुसकी म्हणून भेटायला गेलो. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये मी काल, आज आणि उद्याही माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे.

Someone is plotting against me, alleged MLA Suresh Dhas

 

महत्वाच्या बातम्या