विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे खून प्रकरणी तपास करण्यासाठी विशेष पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. एकूण ५ सदस्य असलेल्या या विशेष तपास पथकामध्ये १ पोलीस निरीक्षक आणि ४ पोलीस हवालदारांचा समावेश आहे. Mahadev Munde
मुंडे कुटुंबियांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महादेव मुडेंच्या हत्येचा तपास सीआयडीकडे द्यावा किंवा एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पाच जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह ४ पोलीस हवालदारांचा समावेश करण्यात आला आहे.
महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास एसआयटी किंवा सीआयडी मार्फत करण्यात येऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, न्याय न मिळाल्यास बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू, असा थेट इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला होता.
परळी शहरात २१ ऑक्टोबर २०२३ रोजी तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या ह्त्येला तब्बल १५ महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही त्यामुळे तपासयंत्रणांवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
महादेव मुंडे यांच्या हत्येला तब्बल 15 महिने उलटून गेले, तरी अद्याप आरोपी मोकाट फिरत आहेत. न्याय मिळावा आणि दोषींना तातडीने अटक व्हावी, या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबियांसह बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. जर आरोपींवर कारवाई झाली नाही, तर कुटुंबासोबत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता.
महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली असली, तरी अजूनही कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिस तपासाला वेग मिळावा यासाठी भाजप नेते सुरेश धस यांनीही मागणी केली होती
Special team to investigate the Mahadev Munde murder case
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत