विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यावरच शंका घेतली आहे. सुरेश धस यांचे बीड मधल्या दहशतवाद विरोधात तांडव सुरू आहे. शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही, असा आरोप धस यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, अंजली दमानिया या भाजपाशी, संघाशी संबंधित आहेत. त्यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होत लोक रस्त्यावर आले होते. याप्रकरणात काही फैसला होणार यात कोणी पडू नये. काहीच फैसला होणार नाही काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपाच्याच गटात बसलेली असतील, असा टोला राऊत यांनी मारला.
वाल्मिक कराड हे इस्पितळात आहेत. त्यांचे कुठे काय दुखतं हे माहिती नाही, तरी ही ते इस्पितळात आहेत. त्यांच्यासाठी रुग्णालयाचा एक मजला रिकामा करण्यात आला आहे. इतर अनेक सोयी-सवलती त्यांना मिळत आहे हे अजित पवार यांना दिसत नाही का ? अजित पवार यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केल्याचे आणि या गोष्टी धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी होणार आहे. याबाबत राऊत म्हणाले, याबाबत मी कसं काय सांगणार? आम्हाला आमदार अपात्र ते निकाल सुद्धा अपेक्षित होता. केंद्राकडून, की न्याय मिळेल संविधान आणि घटनेनुसार न्याय मिळेल. आमदार ज्यांनी पक्षांतर केलं ते अपात्र ठरतील, बेकायदेशीर घटना बाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल पण अपेक्षा या देशांमध्ये न्यायाबाबती ठेवता येत नाही आजच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकुर यांनी सांगितले आहे या देशाचं सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल हे सरकारच्या दबावाखाली आहे.
हे न्यायमूर्ती मदन लोकूर सांगत आहेत. त्यांनी अनेक वर्ष उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात न्यायाधीश पदावर काम केलं आहे अत्यंत वरिष्ठ न्यायाधीश म्हणत आहेत आमचे न्यायव्यवस्था ही सरकारच्या दबावाखाली आहे. आणि त्यानुसार निर्णय घेते, न्यायमूर्ती लोकूर हे इतर न्यायमूर्ती प्रमाणे रिटायर झाल्यावर बोलणारे नाही ते जेव्हा त्यांच्या पदावर होते तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. चंद्रचूड साहेब तीन वर्ष मैदानावर खेळत राहिले बॉल घासत राहिले आणि विकेट घेतलीच नाही.
लाडकी बहीण योजनेबाबत राऊत म्हणाले, नीती आयोग आणि या देशाची शिखर बँक यांनी जी माहिती समोर आणली आहे. त्यात स्पष्ट दिसत आहे निवडणुकीच्या आधी मत मिळवण्यासाठी ज्या रेवडी योजना जाहीर केल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये ढकलले गेला आहे.
लाडक्या बहीण योजनेमुळे 45 हजार कोटींचं खड्डा आहे. अजून कर्जमाफी व्हायची आहे. कर्जमाफीची सुद्धा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे. आम्ही ती घेतल्याशिवाय राहणार नाही. खोटं बोलू नका फडणवीसजी, कर्जमाफी देऊ ही आपली भूमिका आहे. .लाडक्या बहिणी बरोबर तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल. लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये द्यावे लागतील हे तुमचे वचन आहे. त्याच्यामुळे पैसे कुठून आणायचे, मोदींच्या घरातून आणायचे का, अडाणी यांच्या खिशातून काढायचे का गुजरात मधून आणायचे हे तुम्ही ठरवायचं. ज्या घोषणा केल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.
Suresh Dhas tandav against Munde because of the government’s blessing, Sanjay Raut allegation
महत्वाच्या बातम्या