विशेष प्रतिनिधी
नाशिक : कुंभमेळ्यात स्नान करणे ही अंधश्रद्धा नाही, ही आमची श्रध्दा आहे. शेकडो वर्षांपासून हे सुरू आहे, असे प्रत्युत्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे मेळाव्यात कुंभमेळ्यातील गंगा स्नानाची खिल्ली उडवली आहे. अनेक जण खाजवत होते आणि हे बाळा नांदगावकर म्हणतायत गंगेच पाणी घ्या. कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार? असा सवाल ठाकरे यांनी केला.
- चक्क बांग्लादेशीनी घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ, किरीट सोमय्या यांनी दिले पुरावे
यावर महाजन म्हणाले, प्रदूषण आहे घाण पाणी होतं असे समजण्याचे कारण नाही. एकाच वेळी कोट्यावधी लोक आल्यानंतर थोड्याफार प्रमाणावर प्रश्न उद्भवतो. कुंभमेळ्याच्या दरम्यान एक शाही स्नानात लाखो लोक येऊन डुबकी मारणे ही सर्वांची श्रद्धा आहे. धार्मिक स्थान आहे परंपरा आहे. राज ठाकरे यांचे मत वेगळे असू शकते. ही काही अंधश्रद्धा, जादूटोणा नाही.
महाजन म्हणाले, गोदावरीत दूषित पाणी येत. मात्र, आम्ही त्यावर पुरेपूर प्रयत्न करतोय. सीवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू करून पाणी शुद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज ठाकरे प्रदूषणाच्या बाबतीत जे म्हणाले त्याबाबतीत पुरेपूर काळजी आम्ही नाशिकला घेणार आहोत.
Taking bath at Kumbh Mela is not a superstition, it is our faith, Girish Mahajan’s reply to Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- चक्क बांग्लादेशीनी घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ, किरीट सोमय्या यांनी दिले पुरावे
- पैशाची गुर्मी, नशेच्या आहारी गेलेले तरुण समाजकंटकासारखे वागताहेत, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संताप
- माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न? अन्नातून विषबाधा झाल्याचा कुटुंबाचा दावा
- बड्या बापाच्या मद्यधुंद मुलाचे महिलांसमोर अश्लील वर्तन, महिला दिनीच प्रकाराने संताप