विशेष प्रतिनिधी
पुणे : भीमाशंकर मंदिर येथे सुरू असलेल्या बांधकामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शनबंदी लागू असताना, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणी खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी मंदिर विश्वस्त आणि संबंधित पोलिस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सभामंडप आणि इतर सुविधा उभारण्याचे काम सुरू असून जानेवारीपासूनच दर्शनासाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. महाशिवरात्रीसारख्या महत्त्वाच्या दिवशीही भाविकांना रोखण्यात आले होते. अशा परिस्थितीत खासदारांना प्रवेश कसा दिला गेला, यावरून जिल्हा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुबे हेलिकॉप्टरने खेड येथे दाखल झाल्यानंतर वाहनाने मंदिर परिसरात पोहोचले. मार्गात पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेड्स पार करत ते पुढे गेले. मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप उघडून त्यांना आत सोडण्यात आल्याचे समोर आले आहे. दुपारच्या आरतीच्या वेळी गाभारा उघडताच त्यांनी दर्शन घेतल्याची माहिती आहे.
या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असून नियम मोडल्याप्रकरणी पुढील निर्णय प्रशासन घेणार आहे.
Temple Management Faces Action Over Arranging MP Dubey’s Bhimashankar Visit, Show-Cause Notice Issued
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास