विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी अचानक माघार घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाने चांगलीच आगपाखड केली आहे. माघारच घ्यायची हाेती तर इतकी उठाठेव कशाला केली असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहरप्रमुख वसंत माेरे यांनी केला आहे. vasant more
महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा राष्ट्रवादी (शरदवंद्र पवार) पक्षाकडे आली. त्यामुळे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा डभी अर्ज म्हणून तुषार कामटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) विरूध्द राष्ट्रवादी ( अजित पवार) अशी होणाचे चित्र होते.
पण, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर चक्रे फिरली. श्रीकांत पाटील यांच्यासह तुषार कामठे उमेदवारी अर्ज मागे घेतला.
याबाबत वसंत माेरे म्हणाले, विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांचा १ वाजता अर्ज दाखल करायचा होता; पण आम्हाला १ वाजायला १० मिनिटे कमी असताना अर्ज दाखला करायचा आहे, म्हणून फोन आला. तुम्हाला माघार घ्यायची होती, तर एवढी उठाठेव कशासाठी केली. महायुतीला आधीच बाय देऊन टाकायची. महाविकास आघाडी म्हणून आम्ही यातून काय घ्यायचे?” .
वसंत मोरे म्हणाले, “महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्याच्या निवडणुकीतून माघार घेतली. हे पुणे शहराला किंवा महाविकास आघाडीला नवीन नाही. आम्ही महापालिका निवडणुकीला सामोरे जात होतो; तेव्हाही अशाच प्रकारची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. राष्ट्रवादीचे नेते शेवटच्या मीटिंगपर्यंत महाविकास आघाडीसोबत होते. पण, तेव्हा अचानक माजी महापौर अंकुश काकडेंचे अचानक डोके दुखायला लागले आणि फोन बंद करून बसले. आताही हीच पुनरावृत्ती राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीत झाली.”
Thackeray group lashes out at Sharad Pawar group
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन