विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानपरिषदेत सभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. Brahmavakya
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीच्या वेळी मंत्री शंभूराजे देसाइ यांना धक्काबुक्की झाल्याचा आराेप आहे. यावरून जिल्हा पाेलीस अधीक्षक तुषार दाेषी यांच्या निलंबनाचे आदेश विधान परिषदेच्या सभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे यांच्याकडून देण्यात आले. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, खाली विषय झाला की अधिकारी मंत्र्यांच्या ब्रिफींगला आलेला नाही, अशा स्थितीत एखादा दिलेला निर्देश हा सभागृहाचा निर्देश असतो.
एखादा मंत्री बोलतो की निलंबित करेन तेव्हा त्याला तो अधिकार आहे. सभापती यांनी दिलेला निर्देश असतो. वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटीव्हकडून कारवाई होते, पण वस्तुस्थिती वेगळी असेल तर बदलही करू शकतो. आश्वासन पाळता येत नसेल तर हे सभागृहाला सांगावे लागते, जे एक्झिक्युटीव्हचे अधिकार आहेत ते त्यांचे अधिकार आहेत. त्या स्थानावर असताना तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सदस्यांकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदावरून दूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सभागृहाचा विश्वास गमावल्याचा आरोप करत हा प्रस्ताव देण्यात आला आहे.
The Chairman of the Legislative Assembly can give instructions after looking at the situation, but it is not a Brahmavakya, the Chief Minister clarified.
महत्वाच्या बातम्या