विशेष प्रतिनिधी
पुणे : Yogesh Kadam स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचे संभाव्य लोकेशन सापडले आहे. लोकेशननुसार त्याला फॉलो केले जात आहे. पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकावर एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधगृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. वारी सकाळी उजेडात आली. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना कदम म्हणाले,Yogesh Kadam
पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. लोकेशननुसार त्याला फॉलो केलं जातंय. त्याचं संभाव्य लोकेशनही आपल्याकडे आहे. लवकरच आरोपीला पकडलं जाईल. एक असा गैरसमज तयार केला जातोय, सकाळी घटना घडली, ती कालपर्यंत का कळवली गेली नाही? ज्यावेळेला फिर्याद आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच आरोपीला ओळखलं. तो अलर्ट होऊ नये म्हणून ही माहिती बाहेर दिली गेली नाही. जर माहिती आधीच बाहेर दिली असती तर आता जे संभाव्य लोकेशन सापडलं आहे ते मिळाले नसते. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. फक्त गुप्तता पाळण्यात आली आहे.
पुणे शहराच्या बाबतीत ही जी घटना घडली आहे ती एसटी स्टँडच्या आवारात घडली आहे. पोलिसांमार्फत रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ६ वाजल्यापर्यंत कितीवेळा गस्त घातली गेली याची माहिती मी घेतली. सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलीस निरीक्षक फेरी मारून गेल्याचं दिसतंय. पोलिसांकडून दुर्लक्ष झालं नाही. पोलीस अलर्ट नव्हते असंही नाही. आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत, असेही कदम म्हणाले.
पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केलं असून त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेले २३ सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून (एनसीडब्ल्यू) घेण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील तपास अहवाल, फिर्यादीची प्रत तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
The possible location of the accused in the Swargate rape case has been found, says Minister of State for Home Yogesh Kadam
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…