भेट राजकीय नाही, राज ठाकरेंसोबत गप्पा मारल्या की ज्ञानात भर,उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज ठाकरेंसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीला कोणी राजकीय स्पर्श करु नये. ही राजकीय भेट नव्हती, असे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या की आपल्या ज्ञानात भर पडते, असेही ते म्हणाले

सामंत यांनी शनिवारी सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, याविषय़ी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र मंत्री उदय सामंत यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली आहे.

Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा

पुण्यात विश्व मराठी संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरेंना उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित राहिले होते. त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतली.
ते म्हणाले, राज ठाकरे असं व्यक्तीमत्व आहे, राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या की आपल्या ज्ञानात भर पडते. या भेटीकडे कुठेही राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये.

त्यांच्यासमवेत चर्चा केल्यावर अजून काही गोष्टी कळतात. तर गप्पानुरुप चर्चा, मराठी भाषेसह उद्योजकांवर कुठलाही अन्याय होऊ नये, यासाठी मी मंत्री म्हणून पुढाकार घेण्यासंदर्भात राज ठाकरेंकडून मार्गदर्शन घेतले.

The visit is not political, a chat with Raj Thackeray adds to knowledge, explains Uday Samant

महत्वाच्या बातम्या