पत्नीकडू छळ, तक्रारीमुळे कामावरून काढले, तिला माझं मरण हवंय म्हणत पतीने संपविले जीवन

पत्नीकडू छळ, तक्रारीमुळे कामावरून काढले, तिला माझं मरण हवंय म्हणत पतीने संपविले जीवन

woman sexually assaulted

विशेष प्रतिनिधी

हुबळी : तिला माझं मरण हवंय म्हणत पत्नीच्या छळाला कंटाळून एका पतीनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची आणखी एक धक्कादायक घटना कर्नाटकच्या हुबळीमध्ये समोर आली आहे. इं पीटर गोल्लापल्ली असं मृत पतीचं नाव असून रविवारी त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पीटर यांच्या कुटुंबीयांनीदेखील पीटर पत्नीच्या छळामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होते, असा दावा केला आहे.

दोन वर्षांपूर्वी विवाह झालेले पीटर गोल्लापल्ली पत्नी फीभी उर्फ पिंकी हिच्यासमवेत हुबळी येथे राहात होते. तीन महिन्यांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद चालू होते अशी माहिती पीटर यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. “त्यांच्या लग्नाला दोन वर्षं झाली होती. पण तीन महिन्यांपासून वादामुळे ते वेगळे राहात होते. त्यांच्या घटस्फोटाची केस अजूनही न्यायालयात चालू आहे. पिंकीनं घटस्फोटासाठी २० लाखांची नुकसानभरपाई मागितली होती. त्यामुळे पीटर मानसिक तणावात होता.

रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पीटर यांचे कुटुंबीय चर्चमधून परतल्यानंतर त्यांना पीटर यांचा मृतदेह आढळून आला. ‘बाबा, मला माफ करा. माझी पत्नी पिंकीनं माझं जगणं मुश्किल केलं आहे. तिला माझं मरण हवंय. माझ्या पत्नीच्या छळामुळे मी हे पाऊल उचलत आहे’, असं पीटर यांनी पत्रात लिहिलं आहे.

दरम्यान, पीटर यांच्या वडिलांनीही यासंदर्भात पत्नी पिंकीलाच दोष दिला आहे. “माझा मुलगा त्याच्या पत्नीच्या छळामुळेच आमच्यातून निघून गेला. त्यानं तेच पत्रातही लिहिलं आहे. पोलिसांनी ती सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. त्याची पत्नी कधीही उठून माहेरी तिच्या आई-वडिलांकडे निघून जायची. त्यानंतर ती माझ्या मुलाला सांगायची की तुझा जीवही गेला तरी परत येणार नाही. तिच्या भावानं घटस्फोटासाठीची नुकसानभरपाई म्हणून २० लाख रुपये मागितले होते”, असं पीटरचे वडील ओबय्या यांनी सांगितलं आहे.

पिंकीनं एकदा पीटरच्या ऑफिसमध्ये जाऊनही एका बैठकीदरम्यान त्याच्याशी मोठा वाद घातल्याचं ओबय्या यांनी सांगितलं. त्यामुळे पीटरच्या मालकानं त्याला कामावरून काढून टाकलं होतं.

Tired of his wife’s torture, the husband ended by saying that she wanted me dead

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023