विशेष प्रतिनिधी
नाशिक :Jayant Patil भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. यावरून जयंत पाटील यांनी माध्यमांवर चांगलीच आगपाखड केली आहे. एखादी महत्त्वाची बातमी किल करायची असेल तर असे प्रकार वारंवार घडतात असा माझा अनुभव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.Jayant Patil
जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतली. त्यांच्यात तासभर चर्चा झाली अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. यावरून नवीन राजकीय समीकरणे जुळून राजकीय भूकंप येणार असेही म्हटले जात आहे. मात्र या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाल्याच्या आरोपाची जयंत पाटील यांनी खंडन केले आहे.
जयंत पाटील म्हणाले, तुमच्यात कोणी काही बोललं तर तुम्ही त्याला जाऊन विचाराल की नाही. पण तुम्हीच बातम्या तयार करता. तुम्हीच दिवसभर चालवता. महत्वाची बातमी किल करायची असेल तर असे प्रकार घडतात असा माझा अनुभव आहे.
शरद पवार गटाचे काही नेते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच चर्चा आहे. यावर जयंत पाटील यांनी पुन्हा माध्यमांनाच धारेवर धरले. ते म्हणाले,
तुम्हीच कोणा कोणाला कुठे कुठे पाठवत आहे. कोण कशाला जाईल. हे माजी आमदार आहेत. त्यांची काही कामे असतील. ही तीनही नावे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवलेली आहेत. ते पराभूत झाले.
पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणावर ते म्हणाले
पोलिसांचा धाक समाजात राहिलेला नाही .
कायदा सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ताबडतोब सरकारने गांभीर्याने दखल घ्यायला हवी. बस डेपोत असे प्रकार घडणं फार गंभीर आहे. सरकारने याची दखल घेऊन उपाययोजना केली पाहिजे.
एमएमआरडीएमध्ये बिले काढण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप एका फ्रेंच कंपनीने केला आहे. यावर पाटील म्हणाले, तुम्हाला आश्चर्य वाटल असेल. पण ते सगळीकडे सर्रास चालू आहे. अधिकारी लाच मागत असतील . महाराष्ट्रात आलेल्या गुंतवणूकदारांची तक्रार असते सपोर्ट मिळत नाही. आमदार अमोल मिटकरींनी भाष्य केलं एका ओएसडीने आमदाराकडे म्हणजे अमोल मिटकरी यांच्याकडे पैसे मागितले. अधिकाऱ्यांचे धाडस किती पुढे गेले आहे आमदारांकडे पैसे मागतात. याचा अर्थ आमदार काम करणार. आमदाराला यातून पैसे मिळणार आहेत, असे सांगून तुमचा जॉब आहे. याच्यावर तुम्ही स्वतंत्र पत्रकारिता केली पाहिजे. स्वतःहून भूमिका घेतली पाहिजे, असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला.
To kill important news.. Jayant Patil’s big accusation on the media on the talk of defection
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…