विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर फूड मॉलजवळ पहाटे झालेल्या भीषण अपघातामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. दोन अवजड वाहनांमध्ये झालेल्या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, मागून आलेल्या इर्टिगा कारने अपघातग्रस्त वाहनाला धडक दिल्याने आणखी दोघे जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेमुळे मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक मार्ग काही काळासाठी बंद ठेवावा लागला. त्यामुळे लोणावळ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवण्यात आली. जवळपास दोन तास वाहतूक विस्कळीत राहिल्यानंतर अपघातग्रस्त वाहने हटवून मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुदैवाने मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीवर या घटनेचा कोणताही परिणाम झाला नाही.
Two killed in horrific crash on Pune-Mumbai Expressway; Missing Link shut for an hour
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन