विशेष प्रतिनिधी
मुंबइ : Uddhav Thackeray लाडकी बहिण याेजनेतून पाच लाख महिलांना वगळल्याने शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर अपात्र ठरणाऱ्या पाच लाख महिलांना दिलेले पैसे परत घेणार असाल तर त्यांनी दिलेली मतेही तुम्हाला मिळालेल्या मतांतून वगळणार आहात का?”असा प्रश्न करत ही फसवणूक नव्हे तर काय आहे? . तीन तीन भाऊ होते ना, जॅकेट भाऊ, दाढी भाऊ, देवा भाऊ.बहिणींनी त्यांना जाऊन विचारले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.Uddhav Thackeray
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील लाखो महिलांना मासिक आर्थिक लाभ देण्यात येत आहे. आता सरकारने या योजनेचे निकष बदण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे या योजनेसाठी पाच लाख महिला अपात्र ठरणार आहेत. या सरकारच्या या निर्णयावर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आताच येताना मी एक बातमी वाचली. त्यामध्ये पाच लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार असल्याचे समजले. जर लाडक्या बहिणींनी त्यांना विजय मिळवून दिला असेल तर, ही फसवणूक नव्हे तर काय आहे? बहिणींनी त्यांना जाऊन विचारले पाहिजे. तीन तीन भाऊ होते ना, जाकेट भाऊ, दाडी भाऊ, देवा भाऊ.”
आतापर्यंत या योजनेतून पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. जर आता त्यांना दिलेले पैसे परत घेणार असाल आणि इथून पुढे लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मतेही तुम्हाला दिलेल्या मतदानातून वगळणार आहात का? कारण ही तुम्ही फसवून घेतलेली मते आहेत, असा आराेपही त्यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर उध्दव ठाकरे म्हणाले, ते म्हणत आहेत की सहा-सात खासदार फुटणार. पण, हिंम्मत असेल तर फोडून दाखवा. आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत पाहू नका. कारण फोडाफोडी करायला लागलात तर कधी तुमचे डोके फुटेल कळणार नाही. माझे आव्हान आहे, जर फोडाफोडी करायची असेल तर सरकारी यंत्रणा, पोलीस, ईडी, इनकम टॅक्स आणि सीबीआय बाजूला ठेवा आणि हिंम्मत असेल तर एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा.
दरम्यान, लाडकी बहिण याेजनेत महिलांना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
Uddhav Thackeray is aggressive for excluding women from Ladki Bahin
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन