विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या,या विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आरोपानंतर दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचे वॉर सुरु झाले आहे. सुषमा अंधारे यांनी उमेदवारी देण्यासाठी दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
आमदार गायकवाड म्हणाले, निलम गोऱ्हे यांच्यावर टिका करण्याचा अधिकार ठाकरेंच्या शिवसेनेला नाही. त्या तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांच्याकडे ठोस माहिती असते, त्या अनुभवातून बोलतात. यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी देवाण, घेवाणीचा आरोप केला आहे. पण बाळासाहेबांनी कधीच असं केलं नाही. सुषमा अंधारे यांनी आमच्या मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्याकडून दोन कोटी रुपये घेऊन त्यांना उमेदवारी दिली.
माझ्याकडे व्हिडीओ देखील होता, पण मी तो डिलीट केला. बाहेर पडणारे जे सांगतात ते खोटं नाही. ठाणे आणि सातारा पासिंगच्या दोन मर्सिडीज बेंझ ठाकरेंना मिळाल्या आहेत असा आरोप करून गायकवाड म्हणाले की, संजय राऊत आणि आंदोलक हा विषय फिरवत आहेत, हे बाकीच्यांसोबत घडलं आहे. संजय राऊत यांना घाणेरड्या गोष्टी बोलायची सवय आहे. संजय राऊत यांनी शहाणपणा शिकवू नये, ते स्वत:च्या घरात असणाऱ्यांना देखील मोठं करू शकत नाहीत. संजय राऊत हे शरद पवारांना शहाणपणा शिकवू लागले आहेत, गोऱ्हेंनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वयक्तिक वक्तव्य आहे. त्यामुळे पवारांना राऊतांनी शहाणपणा शिकवू नये, मीडिया हुशार आहे/
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा आरोप केला. त्यानंतर ठाकरे गटाचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी गोऱ्हे यांनी आपल्याकडून उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप केला. सुषमा अंधारे यांनी गोऱ्हे यांच्या अडीचशे कोटी रुपयांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली.
War of accusations in both Shiv Sena, this accusation against Sushma Andhare
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…