विशेष प्रतिनिधी
पुणे : रुपाली चाकणकर मामा मला वाचवा म्हणाले आणि लगेच तुम्ही पळाला का? खरात प्रकरणी मंत्री दत्ता भरणेदेखील लाभार्थी आहेत का? असा सवाल संगिता तिवारी यांनी केला आहे. तर दत्ता भरणे चाकणकरांना का क्लीन चीट देत आहेत? असा सवाल करत त्यांनी दत्ता भरणेंवर टीका केली आहे.Dattatray Bharne
संगिता तिवारी म्हणाल्या की, भरणे मामा म्हणताय की रुपाली चाकणकरांची चूक नाही. अहो भरणे मामा तुम्ही काय बोलता आहात? महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांची काही चूकी नाही, अहो मामा त्यांनी मामा मला वाचवा अशी हाक देताच तुम्ही पळत त्यांना वाचवण्यासाठी धावून आलात, तुम्ही त्यामध्ये लाभार्थी आहात का? कशाला बाजू का घेत आहात? टीव्हीवर सगळे काही दाखवत असताना तुम्ही बाजू का घेत आहात? पत्रकार खोटे नाहीत ना? असे म्हणत भरणे यांच्यावर टीका केली आहे.
या प्रकरणी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, खरात प्रकरणाची संपूर्ण माहितीच दत्तात्रय भरणे यांच्याकडे नाही. त्यांनी काय सांगितले की मी कार्यक्रमाला जातो, तेव्हा कुणीही फोटो काढतो, नेत्यांसोबत फोटो काढता हे खरे आहे पण कुणीहरी आपल्या मंत्रीपदाच्या लेटर हेडवर पत्र देत नाही. भरणे मामांना संपूर्ण माहितीच नाही. म्हणून त्यांच्याकडून चूकून हे वक्तव्य झाले आहे असे मी म्हणेल.
दत्ता भरणे या या प्रकरणी बोलताना म्हणाले होते की, या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा काही दोष नाही. काही कार्यक्रमानिमित्त चाकणकरांची आणि महाराजांची भेट झाली असेल, शेवटी आपण कुणाला तरी गुरू मानतो, यात रुपाली चाकणकर यांचा काही दोष नाही. कोणासोबत फोटो काढला तर ती काय चूक आहे का? नाही ना.
“Was Minister Dattatray Bharne Also a Beneficiary in the Kharat Case? Sangeeta Tiwari Questions”
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास