Rohit Pawar : नेमके काय चालले आहे आपल्या राज्यात, आमदार रोहित पवार यांचा काकांना सवाल

Rohit Pawar : नेमके काय चालले आहे आपल्या राज्यात, आमदार रोहित पवार यांचा काकांना सवाल

Rohit Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rohit Pawar आमदार रोहित पवार यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होर्डिंग उभारणीवरून निशाणा साधला आहे Rohit Pawar

अर्थमंत्री महोदय नेमके काय चालले आहे आपल्या राज्यात? हा प्रश्न आज आवर्जून विचारावासा वाटतो, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात शासकीय कार्यालयांच्या आवारात दोनशे डिजिटल होर्डिंग यभरले जाणार आहेत, यावर टीका करताना रोहित पवार यांनी म्हटले आहे की , एकीकडे निधी नाही म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत, लाडकी बहीण योजनेत कपात, युवा प्रशिक्षण योजनेतील युवांना पगार नाहीत तर दुसरीकडे जाहिराती करण्यासाठी शंभर कोटींच्या होर्डिंग उभारणीला मान्यता दिली जाते.



हा निर्णयानुसार शासनाने शासकीय जागांवर स्वतः १०० कोटी खर्च करून डिजिटल होर्डिंग उभारायचे, या होर्डिंगचे परिचालन आणि देखभाल करण्यासाठी खाजगी कंपनी नेमायची, त्याबदल्यात सरकारला १५% सरकारी जाहिराती देता येतील आणि ८५ % जाहिराती खाजगी असतील. शासनाचा हा निर्णय म्हणजे ‘सरकारने स्वतःच्या जागेवर स्वतः खर्च करून घर बांधायचे, घराच्या एका कोपऱ्यात शासनाने राहायचे, घराची साफसफाई देखभाल खाजगी कंपनीने करायची, त्याबदल्यात उर्वरित संपूर्ण घर खाजगी कंपनीने भाड्याने द्यायचे’ असाच हा प्रकार आहे.

हा निर्णय अर्थखात्याचा नसला तरी शेवटी जबाबदारी अर्थमंत्र्यांचीच आहे. अर्थमंत्री शिस्तप्रिय आहेत, त्यामुळे अर्थमंत्री या निर्णयात लक्ष घालून आवश्यक ते बदल करून घेतील, ही अपेक्षा, आहे अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

What exactly is going on in our state, asked MLA Rohit Pawar to his uncle

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023