Amol Mitkari : अजितदादांच्या निधनानंतर नरेश अरोरा कोठे गायब, अमोल मिटकरी यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Amol Mitkari निवडणूक प्रचारासाठी काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स या संस्थेचे प्रमुख असलेले अरोरा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अचानक दिसेनासे झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो, असे म्हणत अरोरांचा शोध घ्यावा लागेल, असा टोला लगावला.amol mitkari

अमोल मिटकरी म्हणाले की, पक्षाच्या प्रचार आणि रणनीतीच्या कामात नरेश अरोरा यांचा मोठा सहभाग होता. अनेक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. अजित पवार यांना गुलाबी जॅकेट देणे, त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे तसेच निवडणूक प्रचारातील विविध कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय दिसत होते. पक्षाच्या अनेक रणनीतीही ते ठरवत असल्याचे मिटकरी यांनी सांगितले. मात्र अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ते फक्त एक-दोन दिवस दिसले आणि त्यानंतर अचानक गायब झाले.amol mitkari



मिटकरी म्हणाले की, अरोरा सध्या नेमके कुठे आहेत याची माहितीही उपलब्ध नाही. ते महाराष्ट्रात आहेत की देशाबाहेर गेले आहेत, याबाबतही स्पष्टता नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतरही ते कुठेच दिसले नाहीत. अशा कठीण काळात त्यांनी पक्षासोबत उभे राहणे अपेक्षित होते, असेही मिटकरी यांनी नमूद केले. त्यांनी किमान एक पोस्ट करून किंवा प्रतिक्रिया देऊन सहानुभूती व्यक्त करायला हवी होती, असेही त्यांनी म्हटले.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विधानसभेत अद्याप सविस्तर चर्चा झालेली नसल्याबद्दलही खंत व्यक्त करताना मिटकरी म्हणाले, अधिवेशनात यावर चर्चा व्हायला हवी होती, मात्र अद्याप तशी संधी मिळाली नाही. पुढील आठवड्यात सुट्ट्या असल्याने अधिवेशन संपण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या विषयावर चर्चा होणार नाही.

After Ajit Dada’s Death, Where Is Naresh Arora Missing? Asks Amol Mitkari

महत्वाच्या बातम्या