विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते.क्षमता, निर्णयक्षमता आणि प्रशासनातील पकड यांचा विचार केला तर मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक असलेले सर्व गुण दादांमध्ये होते. राज्याला एक चांगला मुख्यमंत्री मिळू शकला असता; मात्र ते घडले नाही, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. Ajit Dada
फडणवीस म्हणाले की, दादांची राजकीय कारकीर्द मोठी आणि प्रभावी होती. राजकारणात ते अजून मोठी इनिंग खेळतील, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र जीवनाच्या प्रवासात त्यांनी पहिल्यांदाच टायमिंग चुकवले, असे भावनिक विधान त्यांनी केले. दादांचा वक्तशीरपणा सर्वपरिचित होता, त्यामुळे हे अचानक घडलेले वास्तव अधिक वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले. याची सर्वाधिक हळहळ आपल्याला राहील. Ajit Dada
दादांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत बोलताना फडणवीस यांनी अनेक आठवणी सांगितल्या. मंत्रालयात कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा आधी पोहोचणारे ते नेते होते. सकाळी नऊ वाजता ते आपल्या दालनात बसलेले असायचे. वेळेचे काटेकोर पालन आणि कामातील शिस्त हे त्यांच्या स्वभावाचे मुख्य गुण होते. एखादा निर्णय त्यांना योग्य वाटला नाही तर ते फाईल थांबवून सविस्तर चर्चा करत. निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घेण्याची त्यांची सवय होती, असे त्यांनी स्पष्ट केले. Ajit Dada
फडणवीस म्हणाले की, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी रोज हळदीचे दूध पितो. दादांच्या साध्या सवयी आणि स्वच्छतेकडे असलेले लक्ष त्यांना विशेष वाटायचे. ते चप्पल वापरत, पण पाय नेहमी स्वच्छ ठेवत, अशी आठवण त्यांनी सांगितली. अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील शिस्त आणि नीटनेटकेपणा दिसून येत होता.
Ajit Dada the Best CM Maharashtra Never Had, Devendra Fadnavis Turns Emotional
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका