विशेष प्रतिनिधी
मुंबई:Rohit Pawar गेल्या चार महिन्यापासून दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते. देशपातळीवरचे आणि राज्यपातळीवरचे लोक त्यांच्यासोबत नव्हते. मात्र काही मोजके आमदार दादांसोबत होते. आजही तेच आमदार दादांच्या अपघाताबाबत बोलत असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. हा अपघात आहे की घातपात? हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.Rohit Pawar
पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी पुन्हा एकदा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला. ते म्हणाले, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यावेळी त्यांनी देखील अजित पवार यांच्या अपघाताचे कारण समोर आले पाहिजे, अशी मागणी केली असेल, असे आम्हाला वाटते, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. मोदी आणि शहा यांचा मला वेळ मिळाला नाही. मात्र अधिवेशन चालू असल्यामुळे काही नेते बिझी असतील. मात्र मी मेलच्या माध्यमातून माझे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहे.Rohit Pawar
नरेश अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवा, अशी काहींची भूमिका होती. मात्र, अजित दादांची कॉन्ट्रॅक्ट संदर्भात वेगळी भूमिका होती, असा दावा करताना रोहित पवार म्हणाले. मी कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नसल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. तटकरे आरोरांच्या कॉन्ट्रॅक्ट साठी चर्चेला गेल्याचा अंदाज आहे. मात्र या सर्व गोष्टींची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. दादांना का उशीर झाला? हे मी बोलून दाखवले, दादा गाडीने गेले असते तरी दुर्घटना घडली नसती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष हा एनडीए सोबत जाणार होता का? या संदर्भातल्या प्रश्नाला आपण सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर देऊन स्पष्ट करेल, असं म्हणत रोहित पवार यांनी या उत्तरावर बोलणे टाळले. आम्हाला सत्तेत जायचे असते तर केव्हाच गलो असतो. मात्र विचारासाठी आम्ही संघर्ष करत आलेलो आहोत, असे देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केले. मी कुठेही खोटं बोललेलो नसल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. सोमवारी किंवा मंगळवारी जी पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे काय घडले? कुठे झाले? विरणीकरणावर कोण काय बोलले? या सर्व गोष्टींवर बोलणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितलं.
रोहित पवार यांनी 27 आणि 28 जानेवारीदरम्यान घडलेल्या घटनांची साखळी मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अजितदादा 27 जानेवारीला पुण्याला कारने गेले असते, तर ते पुढील दिवशी बारामतीला पोहोचले असते आणि ही दुर्घटना टळली असती. मात्र त्या दिवशी झालेल्या बैठकीला उशीर झाला, काही महत्त्वाचे फोन आले आणि एका फाईलवर तातडीने स्वाक्षरी करण्याची मागणी झाली. दादांनी ती स्वाक्षरी केल्यानंतर संध्याकाळी 7.13 वाजता विमानाचे बुकिंग झाले, हा तपशील त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केला. रोहित पवार यांच्या मते, जर विमानाने जाण्याचा आधीच निर्णय झाला असता, तर 26 किंवा 27 तारखेलाच बुकिंग झाले असते. त्यामुळे शेवटच्या क्षणी घेतलेला निर्णय संशयास्पद वाटतो, असे ते म्हणाले. त्यांनी कोणावर थेट आरोप केला नसला तरी 27 ते 28 तारखेतील सर्व घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. विशेषत: प्रमुख पायलटने या काळात कोणाला भेटले, कोणाच्या संपर्कात होते, याचाही तपास व्हायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले.
Ajitdada Was Left All Alone, Rohit Pawar Makes Sensational Claim
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये, नवनाथ बन यांचा घणाघात
- पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश ; ‘विशेष नियोजन प्राधिकरण’रद्द
- Shiv Sena : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? 18 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- Ajitdada Pawar : अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान’ राबविणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार