ठाण्यात भाजपची विरोधात बसण्याची तयारी

विशेष प्रतिनिधी

ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र लढले तरी आता भाजपने विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली आहे. BJP

आम्ही आधीही चौकीदार म्हणून काम केले आहे. आमचं काम जनतेशी जोडलेलं आहे. त्यामुळे कुठेही असलो तरी अंकुश ठेवण्याचे काम निश्चित केले जाईल, असे वक्तव्य करून विरोधात बसण्याची भूमिका भाजप आमदार संजय केळकर यांनी मांडली आहे.



भाजपचे दुसरे आमदार निरंजन डावखरे यांनीही केळकरांच्या सुरात सूर मिळवत कोणत्याही भूमिकेत असलो तरी भाजप ठाणेकरांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे म्हटले आहे.
भाजपने विरोधात भूमिका घेतली असली तरी शिवसेनेचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे निकवर्तीय नरेश म्हस्के यांनी सत्तेतही भाजप सोबत असेल असे माध्यमांना सांगितले आहे. आम्ही ठाण्यात युती म्हणून लढलोय. त्यामुळे यासंदर्भात निरंजन डावखरेंशी संवाद सुरू असल्याचेही नरेश म्हस्के यांनी माहिती दिली.

ठाण्यात भाजपला उपमहापौरपद हवंय तसेच स्थायी समितीचं अध्यक्षपद हवंय, अशी माहिती मिळत आहे. तर एकहाती सत्ता असल्यामुळे शिवसेनेची भाजपला स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याची तयारी नाही. त्याबदल्यात उपमहापौरपद आणि तर समित्यांचे अध्यक्षपद देण्याची तयारी असल्याचे कळते. त्यामुळे भाजपने विरोधात बसण्याची भूमिका घेतली आहे. त्याचवेळी मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. ठाण्यात कशी बार्गेनिंग होते तशी बार्गेनिंग मुंबईत करण्याचा शिवसेनेचा प्लान आहे.

BJP Ready to Sit in Opposition in Thane

महत्वाच्या बातम्या