विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुठल्याही पोलिसाचा अमली पदार्थांशी संबंध आढळल्यास त्याचे निलंबन न करता थेट बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुंबईत ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद-२०२५’ आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतानामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ड्रग्स संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलीसी असणार आहे. कुठलाही पोलीस,कोणत्याही रँकचा असेल, तो ड्रग प्रकरणात थेट संबंधात सापडला तर निलंबित न करता थेट बडतर्फ करण्यात येईल.
महाराष्ट्र पोलिस परिषद पार पडली असून यात विविध विषयांवर चर्चा झाली. देशात तयार झालेल्या तीन नवीन कायद्यांच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणीबाबतचे सादरीकरण झाले. सायबर गुन्हे रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सायबर प्लॅटफॉर्मचे सादरीकरण झाले. यासोबतच महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी, तसेच अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणून वेळेत आरोपपत्र कसे केले जाईल यासंदर्भात चर्चा झाली. तसेच ड्रग्ज संदर्भातील कारवाईबाबतची चर्चा झाली.
Direct dismissal if found related to drugs, CM Devendra Fadnavis warns police
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…