एकनाथ शिंदे कभी झुकता नही, झुकाया सबको..ठाण्यात डायलॉगबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा

एकनाथ शिंदे कभी झुकता नही, झुकाया सबको..ठाण्यात डायलॉगबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा

विशेष प्रतिनिधी

ठाणे : एकनाथ शिंदे कभी झुकता नही. झुकाया सबको.. म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचा साधा कार्यकर्ता.. मला हलक्यात घेऊ नका, अशी डायलॉग बाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी हिंदी चित्रपटातील डायलॉग म्हणत आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिंदे म्हणाले, मी शब्दाला पक्का माणूस आहे. शब्द दिला तर मागे फिरत नाही. कुठलातरी पिक्चर मध्ये डायलॉग आहे. एक बार कमिटमेंट करली तो मै खुद की भी नहीं सुनता… हे माझे आहे. वॉन्टेड पिक्चर मधला डायलॉग आहे.

जे आरोप करतात ते वॉन्टेड होतील आता. आम्हाला काय करायचं फोडाफोडी आणि एकनाथ शिंदे फोडाफोडी बिलकुल करत नाही. आपोआप लोकं येत आहे. शोले मधला डायलॉग आहे ना. आधे उधर जाओ आधे उधर जाओ.. बाकी मेरे पीछे Save.. पीछे बघितलं तर कोण नाही. उद्धव ठाकरे यांना शाळजोडीतील देत ते मानले,

ते त्यांचे ९७ जागा लढले फक्त २० जागा जिंकले. समोरच्यांवर मी वाईट बोलू इच्छित नाही. पण त्यांचे शिव्याशाप देणं सुरूच आहे. आता तरी तुम्ही सुद्धा आमच्याकडे आले तर तुम्हाला शिव्याशाप देतात. ते तुमच्याकडून आमच्याकडे का आले? त्याचा तुम्ही विचार करणार की नाहीविधानसभेत भाषण करताना बघा तुम्ही. त्यांनीआरोप केले. त्याच्यावर मी आरोप केले नाहीत आणि उत्तरही नाही दिलं. मी आरोपाला काम कारण उत्तर दिलं. म्हणून मला जनतेने साथ दिली. काल पण काहीतरी बोलले. रोज काही ना काही बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना, मला देखील शिव्या देतात. एवढ्या किलो शिव्या दिल्या, त्याच वजन केलं तर किती होईल ते माहित नाही.

संजय राऊत यांना टोला मारताना ते म्हणाले, डॉक्टर नसताना मी मोठे मोठे ऑपरेशन केले. भुल न देता केले. मला कोणी हलक्यात घेऊ नका. एवढेच सांगतो. आपलं काम चालू रखने का.

सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणायची कॉमन मॅन . आता डीसीएम झालो. आता डेडिकेटेड टू कॉमनमेन आहे, असे सांगून ते म्हणाले,मी राज्याचा मुख्यमंत्री झालो, यात ठाणेकरांचं मोठे योगदान आहे – एकनाथ शिंदेमहाराष्ट्रात आणि देशात कुठेही गेलो तर किसन नगर मध्ये आल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद घरातला आहे.एकनाथ शिंदे यांना तुम्ही लहानपणापासून पाहिलं. शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, विरोधी पक्ष नेता या राज्याचा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे किसन नगर आणि ठाणेकरांच खूप मोठ योगदान आहे. अडीच वर्षाच्या काळात पायाला भिंगरी लावून काम केलं, रात्रंदिवस केलं.

लाडकी बहिण महाराष्ट्राचा हा पॅटर्न सगळ्या देशभरामध्ये लागू करत आहे. ही सगळी योजना म्हणून एक कुटुंब योजना झाली. पद येतात, पद जातात.. पुन्हा येतात. पद.. सत्ता जाते… सत्ता पुन्हा येते. नाव गेलं तर परत येत नाही असं बाळासाहेब सांगायचे. २.५० कोटी बहिणीचा लाडका भाऊ अशी माझी ओळख मिळाली, हे सगळ्या पदापेक्षा मोठ आहे. तुमच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे जोपर्यंत आहे शेवटच्या रक्तच्या थेंबापर्यंत माझ्या तमाम लाडक्या बहिणीच्या आणि लाडका भावांचा अधिकार आहे. . शेवटच्या थेंबापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्राची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा आणि विधानसभेमध्ये यश मिळालं. ८० जागा लढलो आणि साठ जागा जिंकलो विधानसभेचा पिक्चर सुपरहिट झाला. आनंद दिघे साहेबांचा देखील पिक्चर सुपरहिट झाला. आता तिसरा सिनेमा देखील काढायचा आहे. त्याचं नाव आता मला माहित नाही. तो पण सुपरहिट होणार, असे त्यांनी सांगितले.

Eknath Shinde never bows down, Dialogue in Thane targeting Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023