विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्याला मराठीचा गर्व असलाच पाहिजे. पण, मराठी बोलता बोलता जर आपला मुद्दाच पोहचला नाही तर मराठीचे काय लोणचे घालायचे? असा प्रश्न अध्यात्मिक गुरू गाैर गाेपाल दास (Gopal Das) यांनीउपस्थित केला प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी ‘टेक वारी: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ दि मंत्रालयात साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गौर गोपाल दास बाेलत हाेते.
यावेळी मराठी भाषेवर बोलताना गाैर गाेपाल दास म्हणाले, भाषा कुठली बोलायची यापेक्षा आपला मुद्दा पोहचणे गरजेचे आहे. भाषा ही महत्त्वाची असतेच, आपल्याला मराठीचा गर्व असलाच पाहिजे. पण, मराठी बोलता बोलता जर आपला मुद्दाच पोहचला नाही तर मराठीचे काय लोणचे घालायचे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मोबाईल आणि समाज माध्यमाचा उपवास करणे गरजेचे असल्याचे सांगताना ते म्हणाले, हा उपवास केला तर देव साक्षात खाली येईल आणि म्हणेल आता काय रडवतो का? आता प्रेमाची भाषा टेक्नोलॉजीने बदलली आहे. आपण टेक सेवी झालो आहे. तांत्रिक प्रगती आपण केलेली आहे. आपण टेक्नॉलॉजीला स्वीकारले केले आहे. आपण वैयक्तिक जीवनात टेक्नोलॉजीचा वापर करत आहोत, पण आपल्या कामात आपण टेक सेव्ह झालो आहे का? आपल्या कामात हे करणे गरजेचे आहे, म्हणून आपण आयुष्यभर विद्यार्थी असलो पाहिजे. आपल्याला अल्जाइमर नाही झाला पाहिजे म्हणून आपण मेंदू ॲक्टिव ठेवला पाहिजे.
माणसाने नेहमी शिकत राहावे हे समजाऊन सांगताना गौर गोपाल दास यांनी घारीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, घारीच वय 70 वर्ष आहे पण 40 झाले की तिच्या पंखातले बळ कमी होते, मासा पकडणारी चोच कमकुवत होती, नखांना धार राहत नाही. जर नवीन टेकला अपडेट केले नाही तर मरून जाल. त्रास नाही तर आयुष्य नाही. घार डोंगरावर जाऊन सगळे जुने पंख नखे काढून टाकते. दोन-तीन महिन्यांनी सगळे नवे येते त्यानंतर ही घार उंच भरारी घेण्यासाठी तयार असते.
गौर गोपाल दास ‘टेक वारी’चा अर्थ समजाऊन सांगताना म्हणाले, टेक वारीतला हा पहिला शब्द टेक हा आहे, तर घाबरू नका, भरपूर संधी आहे. 100 दिवसात 5 लाख कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. आपण मराठी महाराष्ट्रीयन शिकण्यासाठी किती उत्साही आहोत. पंढरपुरात मंदिरात विठ्ठल उभा आहे, महाराष्ट्रातून सगळे चालत जातात राम कृष्ण हरी म्हणत. काही जण हेलिकॉप्टरने जातात म्हणजे उपमुख्यमंत्री, आपल्या मंत्रालयातही विठ्ठल आहे आणि तो आहे तंत्रज्ञान आणि आपल्याला त्याकडे चालत जायचे आहे. या मंदिराचा अभंग आह. एआय ब्लॉक चेन साइबर सिक्योरिटी म्हणून वारी हा शब्द महत्त्वाचा आहे. जेन झी आला आहे, तुमची नोकरी खाऊन टाकतील. मराठी मधला ‘ळ’ गेला तर होळी नाही, पोळी नाही, मिसळ नाही, काही नाही, मराठीचा अभिमान आहे ‘ळ’, असेही गौर गोपाल दास म्हणाले.
टेक वारीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटन करण्यासाठी रोबोटने अजित पवारांना कात्री आणून दिली, त्याचा संदर्भ देत नीट काम करा नाहीतर तुमच्या जागी रोबोट येईल, असे अजित पवार म्हणाले.
कार्यक्रमात स्वागतावेळी टॅावेल आकाराची शॅाल दिली. टॉवेल आकाराची शाल दिली नसती तरी परवडले असते. किती काटकसर चालली आहे ते मी बघत होतो, आपलेच सरकार आहे, असा टाेला अजित पवारांनी लगावला.
Gopal Das said, “What is wrong with Marathi?”
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा