विशेष प्रतिनिधी
मुंबई : मी मोदीभक्त आहे. भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम आहे, महापालिका निवडणुकीत मुंबईत नक्कीच कमळ फुलेल, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी व्यक्त केला. .
मुंबईतील बोरिवलीत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात अभिनेता महेश कोठारे यांनी थेट आगामी मुंबईचा महापौर भाजपचा आणि इथलाच असेल, असे वक्तव्य केलं. तसेच, मोदीभक्त आहे, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम आहे, महापालिका निवडणुकीत मुंबईत नक्कीच कमळ फुलेल, अशी राजकीय फटकेबाजी कोठारेंनी केलीय.
कोठारे यांनी लोकसभा निवडणुकांचा संदर्भही यावेळी दिली. मी जेव्हा पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर केंद्रीयमंत्री म्हणून निवडून येत आहेत.
आता जर या विभागातून येणारा नगरसेवक हा केवळ नगरसेवक नसेल तर भाजपने ठरवलं, नव्या चेहऱ्यांना संधी द्यायचं तर मुंबईचा महापौर इथूनच निवडला जाईल, असेही महेश कोठारे यांनी म्हटलं. महेश कोठारेंचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आता, राजकीय वर्तुळातून यावर काय प्रतिक्रिया येतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
I am a Modi devotee, BJP’s mayor in Mumbai Municipal Corporation, says veteran actor Mahesh Kothare
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा