Uddhav Thackeray : मनसे सोबतच्या युतीबाबत संदेश नाही तर थेट बातमीच देईन, उद्धव ठाकरे यांची सुचक विधान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनसे सोबतच्या युतीबाबत मी संदेश नाही तर थेट बातमीच देईन, असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये याबाबत चर्चा तर सुरू झाली नाही ना अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी या युतीबाबत सकारात्मक उत्तर दिल्याने महापालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Uddhav Thackeray

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेत गेलेल्या सुजाता शिंगाडे यांच्या घरवापसीसाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे – उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, “जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल. याबाबत जे बाकीचे बारकावे आहे, ते आम्ही पाहात आहोत. त्यामुळे संदेश कशाला? मी बातमीच देईन तुम्हाल, असे सूचक विधान त्यांनी केले.



माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे कोणते नेते आमच्या एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. त्यामुळे आम्ही कोणताही संदेश देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती आम्ही देऊ, उध्दव ठाकरे म्हणाले.

मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी एक कॉल करावा, राज ठाकरे शंभर पावले पुढे येतील असे म्हणत एक प्रकारे युतीसाठी बोलणी करण्यासाठी आवाहन केले. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे.

मनसे – ठाकरे गट युतीबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेले आहे. आम्ही सकारात्मक आहोत, राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे आणि आम्ही त्यांचे सहकारी अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला असेल. त्यामुळे यासाठी चिंतेचे कारण नाही. मी या दोन्ही भावांना पाहिले आहे. त्यामुळे 10 मिनिटांनी मी राज ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना फोन करणार आहे, असे हे दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करनार नाही ना. काय सांगावे फोन झाले सुद्धा असतील.

I will not give a message about the alliance with MNS, but only give direct news, says Uddhav Thackeray’s suggestive statement

महत्वाच्या बातम्या