Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी; सदनिका घोटाळ्यात अटकेची टांगती तलवार कायम

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Manikrao Kokate राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर त्यांचीमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला.Manikrao Kokate

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर आता कोकाटे यांचे खाते हे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आता हे खाते कोणाकडे दिले जाणार याचा निर्णय हा अजित पवार यांच्याकडे असणार आहे.Manikrao Kokate



नाशिक सत्र न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आला.
माणिकराव कोकाटे हे वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी विधीमंडळाच्या सभागृहात चक्क मोबाईलवर ‘रम्मी’ गेम खेळल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा राजीनामा न घेता केवळ खातेबदल करण्यात आला होता, ज्यामुळे त्यांना आपले तत्कालीन कृषी मंत्रिपद गमवावे लागले होते.

सरकारच्या प्रतिमेच्या दृष्टीने योग्य निर्णय – प्रवीण दरेकर

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले, मला वाटते की कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल तर सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेच्या दृष्टीने हे त्याठिकाणी योग्य आहे. आता टप्प्या टप्प्याने सरकार भूमिका घेईल. सरकारचे अभिनंदन केले पाहिजे कारण लोकांच्या मनात किंवा कोर्टाने एखादा निर्णय घेतल्यावर तात्काळ दखल घेतली आहे.

Manikrao Kokate’s removal from the ministerial post: Governor approves the Chief Minister’s recommendation; The hanging sword of arrest in the flat scam remains

महत्वाच्या बातम्या