विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील विविध महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली असून, यामध्ये मुंबप्रतिनिधी ई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी तर पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यासोबतच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपदही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
महानगरपालिका महापौर आरक्षण सोडतीनुसार विविध महापालिकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
महापालिका महापौर आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे:
कल्याण-डोंबिवली – ST प्रवर्ग
अनुसूचित जाती (SC):
ठाणे – SC प्रवर्ग
जालना – SC महिला प्रवर्ग
लातूर – SC महिला प्रवर्ग
ओबीसी प्रवर्ग:
पनवेल – ओबीसी
इचलकरंजी – ओबीसी
उल्हासनगर – ओबीसी
कोल्हापूर – ओबीसी
ओबीसी महिला प्रवर्ग:
चंद्रपूर
जळगाव
अकोला
अहिल्यानगर
सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग:
मुंबई – खुला प्रवर्ग
नवी मुंबई – खुला प्रवर्ग
मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग
सांगली – खुला प्रवर्ग
नागपूर – खुला प्रवर्ग
परभणी – खुला प्रवर्ग
नाशिक – खुला प्रवर्ग
अमरावती – खुला प्रवर्ग
वसई-विरार – खुला प्रवर्ग
नांदेड – खुला प्रवर्ग
संभाजीनगर – खुला प्रवर्ग
सोलापूर – खुला प्रवर्ग
सांगली-मिरज – खुला प्रवर्ग
माळेगाव – खुला प्रवर्ग
सर्वसाधारण महिला प्रवर्ग:
पुणे – खुला (महिला)
पिंपरी-चिंचवड – खुला (महिला)
भिवंडी – खुला (महिला)
आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याने प्रत्येक महापालिकेत महापौरपदासाठी कोणत्या प्रवर्गाचा उमेदवार संधीस पात्र ठरणार, हे स्पष्ट झाले असून, त्यानुसार राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
Mayor Reservation Announced for Maharashtra Civic Bodies; Mumbai Open Category, Pune Reserved for Women
महत्वाच्या बातम्या
- पूर्व पुण्याच्या राजकारणात नवा अध्याय, रणनीती, संघटन व जनसंपर्काच्या जोरावर सुरेंद्र पठारे यांची दमदार कामगिरी
- पुण्यातला पहिला निकाल, प्रभाग क्र. २० भाजपचे तीन, प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप
- मुंबईत फुलणार ११० पेक्षा जास्त कमळाची फुले, माेहित कंबाेज यांचा दावा
- पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ५२.४२ टक्के मतदान