विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला. 80 हजार 952.56 कोटी रुपयांचा आणि 89.84 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज दुपारी स्थायी समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला.mumbai budget
मुंबई महापालिकेचा मागील वर्षासाठी 74 हजार 427.41 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 19.35 कोटी रुपयांनी जास्त आहे. विकासकामांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच, प्रशासकीय खर्चात बचत करण्याचे धोरण अवलंबले असल्याचे आयुक्त गगराणी यांनी सांगितले.mumbai budget
मुंबई महापालिकेसाठी महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. साडेतीन वर्षांचे प्रशासक राज संपल्यानंतर प्रथमच स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहराचा कारभार मुंबई महापालिकेमार्फत चालतो. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष असते.mumbai budget
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सादर केला जाणार असून या आर्यसंकल्पाचा आकडा ४२०० कोटी रुपयांचा असेल. यात शालेय पटसंख्या वाढीसह मराठी शाळा टिकवणे, नवीन शाळांची उभारणी आणि मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्यावर भर दिला गेला असल्याची माहिती मिळत आहे.mumbai budget
Mumbai Municipal Corporation presents budget worth Rs 80,952.56 crore
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका